CM फडणवीस मराठाद्वेष्टे, कधीही आरक्षण देणार नाही; भास्कर जाधव भडकले

Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे

Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis

Bhaskar Jadhav On Devendra Fadnavis : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंतरवाली सराटी येथे 29 ऑगस्टपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणावरुन शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री फडणवीस मराठा समाजाला आरक्षण देणार नाही. ते प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना पुढे करुन शब्द द्यायला लावतात आणि नंतर तो शब्द पूर्ण करत नाहीत अशी टीका भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली आहे. तसेच महायुती सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही ही वस्तुस्थिती आहे अशी टीका देखील भास्कर जाधव यांनी माध्यमांशी बोलताना केली आहे.

माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले की, सरकारमधील कुठल्याच नेत्यावर आता जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचा विश्वास राहिला नाही. मनोज जरांगे यांच्या उपोषणाला महायुती (Mahayuti) सरकारच जबाबदार आहे. मुख्यमंत्री हे मराठाद्वेष्टे आणि मराठीद्वेष्टे आहेत. प्रत्येक वेळी नवीन जीआर काढून मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवायचं आणि त्यांचा विश्वासघात करायचा या सगळ्या गोष्टीमुळे जरांगे आता उद्विग्र झाले आहेत. यावेळी मी जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे असं भास्कर जाधव म्हणाले. तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी सध्या सगळ्या क्षेत्रात दादागिरी सुरु आहे. हम करे सो कायदा असा प्रकार राज्यात त्यांनी सुरु केला असल्याची टीका देखील भास्कर जाधव यांनी केली आहे.

IPL 2027 ‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियम रद्द होणार? बीसीसीआय घेणार मोठा निर्णय –

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना भास्कर जाधव यांनी मराठी सक्तीच्या निर्णयावरुन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठी भाषेचा भाजपला किती तिरस्कार आहे आणि मराठी भाषेच्या विरोधात त्यांची काय भूमिका आहे याचं हे उदाहरण आहे. भाजपला आता मित्र पक्ष ओझं वाटू लागलं आहे. त्यांना मित्र नको त्यांना केवळ सत्ता पाहिजे असं देखील भास्कर जाधव म्हणाले.

follow us