भुजबळ घेणार भाजपाची साथ; नांदगाव-मनमाडमध्ये ‘शिंदे सेने’ला टक्कर देण्याची तयारी

Bhujbal नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा फेरबदल घडवणारी घटना उघडकीस आली आहे.

Untitled Design (9)

प्रशांत घोडसे, प्रतिनिधी मुंबई:

Bhujbal will join hands with BJP; Preparing to challenge ‘Shinde Sena’ in Nandgaon-Manmad : नाशिक जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा फेरबदल घडवणारी घटना उघडकीस आली आहे. येवला मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ आणि भारतीय जनता पार्टीचे जिल्हा निवडणूक प्रभारी आमदार डॉ. राहुल आहेर यांची शनिवारी येवला येथील संपर्क कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सविस्तर चर्चा झाली. विशेषतः नांदगाव आणि मनमाड नगर परिषद निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) यांना रोखण्यासाठी रणनीती आखण्यात आली असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

खुर्चीसाठी चिमटे भोवलं; गडकरींसमोर असभ्य वर्तन करणाऱ्या पोस्ट मास्तर जनरलचं निलंबन…

या बैठकीस भाजपचे जिल्हाध्यक्ष यतीन कदम, युवक जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, मनमाडचे माजी नगराध्यक्ष गणेश धात्रक, तसेच पदाधिकारी पंकज खताळ आणि नानासाहेब लहरे उपस्थित होते.नाशिक जिल्ह्यातील छगन भुजबळ हे अनेक वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावशाली नेते म्हणून ओळखले जातात. मात्र नांदगाव विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पुत्र पंकज भुजबळ यांच्या पराभवानंतर शिवसेनेचे आ. सुहास कांदे यांनी आपले प्राबल्य मजबूत केले आहे. परिणामी भुजबळ विरुद्ध कांदे हे राजकीय द्वंद्व आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणांगणातही उतरल्याचं स्पष्ट दिसत आहे.

हिंदू राष्ट्राची निर्मीती कशी?, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठं विधान

सुहास कांदे यांनी नांदगाव आणि मनमाड नगर परिषदेवर पुन्हा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी जोरदार मोहीम सुरू केली आहे. दुसरीकडे समीर भुजबळ यांनी भाजपाशी ‘मिळतं-जुळतं’ समीकरण तयार करत विरोधी पक्षांची एकत्रित ताकद उभी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.राजकीय वर्तुळात चर्चा आहे की — मनमाड आणि नांदगाव नगर परिषदेच्या निवडणुकीत “भाजपा-राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध शिंदे गटाची शिवसेना” असा थरारक सामना रंगू शकतो.

शिरूर नगरपरिषदेत अभूतपूर्व स्थिती; भाजप, लोकशाही आघाडीनंतर धारीवालांचीही माघार

भुजबळ आणि कांदे यांच्यातील शाब्दिक चकमकी तर राज्यभर प्रसिद्ध आहेतच; मात्र आता हे द्वंद्व थेट नगराध्यक्षांच्या खुर्चीपर्यंत पोहोचणार असल्याचं दिसतं. कोणाची बाजू भारी पडणार आणि कोणाची सरशी होणार — हे येणाऱ्या स्थानिक निवडणुकीत ठरणार आहे. एकंदरीत, भुजबळ विरुद्ध कांदे हीच नाशिक जिल्ह्याच्या आगामी निवडणुकीची मध्यवर्ती लढत ठरणार असून, या राजकीय रणसंग्रामात भाजपची साथ घेऊन भुजबळ पक्षाने नवा राजकीय ‘फासा’ टाकल्याचं स्पष्ट होत आहे.

follow us