Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंनी मानले राज ठाकरेंचे आभार; म्हणाले राज ठाकरे हे…

  • Written By: Published:
Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out   2023 03 23T112551.401

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यांनी शिंदे-फडणवीस सरकार व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. राज ठाकरे यांनी काल आपल्या भाषणामध्ये मुंबईच्या माहीम येथील अनधिकृत मजारीवर कारवाई करावी याची मागणी केली होती. त्यानंतर आज सकाळीच मुंबईतली प्रशासनाने तेथील अनधिकृत बांधकाम पाडले आहे. यानंतर बावनकुळे यांनी राज्य सरकार व राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

अनेकवेळेला सरकारपर्यंत या गोष्टी पोहोचत नाही. खालचे अधिकारी या गोष्टी सरकारपर्यंत पोहोचवत नाही. एखाद्यावेळेला काही गोष्टी सांगणे राहून जाते. पण मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले आहेत. जाणीवपूर्वक अनधिकृत बांधकाम करणे हे योग्य नाही, असे बावनकुळे म्हणाले आहेत.

आमदार, खासदारांसह मुख्यमंत्री शिंदे एप्रिलमध्ये अयोध्या दौऱ्यावर?

तसेच राज ठाकरे हे मुसलमानांच्या विरोधात नाही आहेत. त्यांचे पूर्ण भाषण मी ऐकले आहे. त्यांनी जावेद अख्तर यांचे भाषण ऐकवले. देशाच्या विरोधात जे बोलतात त्यावर राज ठाकरे बोलले आहेत. फक्त 1 टक्के लोक अशा प्रकारचे कृत्य करतात, असे बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच मनसैनिकांवरील भोंग्याचे गुन्हे सरकारने परत घ्यावे, असेही बावनकुळे म्हणाले आहेत.

राज ठाकरेंचा एक इशारा अन् साफ माहीम किनारा…

दरम्यान, याआधी काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक व्हिडीओ दाखवत धक्कादायक गौप्यस्फोट केला होता. मुंबईतील माहिमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम सुरू असल्याचा दावा ठाकरे यांनी केला होता. हे सुरू असलेले अनधिकृत बांधकाम जर  एका महिन्यात पाडले नाही  तर त्याच्या बाजूला आम्ही गणपती मंदिर उभे करू असा इशारा त्यांनी यावेळी दिला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube