दोन चार मिनटं उशीर झाला असता तर काही…, दरेकरांनी सांगितला लिफ्टमध्ये अडकल्याचा प्रसंग

Pravin Darekar Stuck In a Lift : भाजपाचे नेते प्रवीण दरेकर वसईत (Darekar) असताना एका लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. पाच ते सात मिनिटं ते लिफ्टमध्ये अडकले होते. दरेकर लिफ्टमध्ये अडकले आहेत, हे समोर येताच कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडली आणि दरेकर यांना बाहेर काढलं. दरम्यान, आता खुद्द दरेकर यांनीच घडलेल्या प्रसंगाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी काही मिनिटे उशीर झाला असता तर माझं काही खरं नव्हते, अशी प्रतिक्रिया दरेकर यांनी दिली आहे. दरम्यान, सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या स्वयंपूर्ण विकास मार्गदर्शन शिबिरासाठी दरेकर वसईत आले होते. साधारण चार वाजेच्या सुमारास दरेकर हॉलमध्ये आले होते. त्यावेळी ते लिफ्टमधून तिसऱ्या मजल्यावर जात होते. या लिफ्टची दहा लोकांना घेऊन जाण्याची क्षमता होती. मात्र, या लिफ्टमध्ये जवळपास पंधरा लोक या लिफ्टमध्ये गेले होते.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचा तो व्हिडिओ समोर; छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया काय?
तसंच क्षमतेपेक्षा जास्त लोक या लिफ्टमध्ये गेल्यामुळे ही लिफ्ट तिसऱ्या मजल्यावर जाण्याऐवजी थेट तळमजल्यावर गेली. त्यानंतर ही लिफ्ट अडकून पडली आणि बंद पडली. अचानकपणे लिफ्ट बंद बडल्यामुळे एकच खळबळ उडाली. वेळीच पोलीस, सुरक्षारक्षक तसेच भाजपाच्या कार्यकर्त्यांनी लिफ्ट तोडून दरेकर यांना बाहेर काढलं. लिफ्टमधून बाहेर आल्यानंतर दरेकर घामाघूम झाले होते. बाहेर येताच ते पाणी पिले आणि लगेच पायऱ्यांनी ते तिसऱ्या मजल्यावर गेले. सर्वांनी प्रसंगावधान दाखवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
लिफ्टमध्ये अडण्याच्या घटनेनंतर दरेकर यांनी भिवंडीमधील अशाच एका गटनेची आठवण सांगितली. लिफ्ट आणि माझ्यात नेमकं काय शत्रूत्त्व आहे हे माहिती नाही. भिवंडीलादेखील मी अडकलो होतो. मी लिफ्टमध्ये अर्धा तास अडकलो. लिफ्टमध्ये आमच्या मंदाताई होत्या. मंदाताईं अस्वस्थ झाल्या होत्या. आणखी दोन चार मिनटं उशीर झाला असता तर माझं काही खरं नव्हतं, अशी हकीकत दरेकर यांनी सांगितली. तसंच मी साधारण पाच ते सात मिनिटे लिफ्टमध्ये अडकलो होतो. पण मी सुखरूप बाहेर आलो.