मोठी बातमी! चंद्रपूरमध्ये भाजपच्या संगीता खांडेकर महापौर

Chandrapur Politics : चंद्रपूर महापालिकेत भाजपने मोठा चत्मकार घडवत महापौर बसवला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्या आहेत.

  • Written By: Published:
Chandrapur Politics

Chandrapur Politics : चंद्रपूर महापालिकेत भाजपने मोठा चत्मकार घडवत महापौर बसवला आहे. भाजपच्या संगीता खांडेकर महापौर झाल्या आहेत. महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपला 32 तर काँग्रेसला 31 मते मिळाली आहे. या निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक अनुपस्थित राहिले होते तर एमआयएमने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला.

चंद्रपूर महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेसने (Congress) 27 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला होता तर या निवडणुकीत भाजपला (BJP) 23 जागा मिळाले होते मात्र तरीही देखील चंद्रपूर महापालिकेत (Chandrapur Municipal Corporation) भाजपने आपला महापौर बसवला आहे. महापौर निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाने भाजपला पाठिंबा दिल्याने चंद्रपूर महापालिकेत आता भाजपची सत्ता स्थापन झाली आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर महापालिकेसाठी पहिलं सव्वा वर्ष भाजपचा तर त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचा महापौर असणार आहे.

टॅक्सच्या नावाखाली मुंबईकरांची लूट सुरू होणार? भाजपच्या ‘त्या’ पत्रावरून आदित्य ठाकरेंचा संताप!

चंद्रपूर महापलिका निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसच्या खासदार धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात सुरु असणारी गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात जोराने सुरु असून काँग्रेस हायकमाड यावर आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

झी स्टुडिओजच्या ‘सुपर डुपर’चा टीझर प्रदर्शित! कौटुंबिक महासोहळा रंगणार 3 एप्रिलला-

काही दिवसांपूर्वी दोन्ही गटातील नगरसेवकांनी दिल्ली येथे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती यानंतर चंद्रपूरात काँग्रेस सत्ता स्थापन करणार असल्याची चर्चा होती मात्र आता भाजपने बाजी मारली असून चंद्रपूर महापालिकेचे सूत्र आपल्या हाती घेतल्या आहेत.

follow us