Rohit Pawar यांना हायकोर्टाचा दिलासा; बारामती अ‍ॅग्रोमधील युनिट बंद करण्याचा आदेशच रद्द

Rohit Pawar यांना हायकोर्टाचा दिलासा; बारामती अ‍ॅग्रोमधील युनिट बंद करण्याचा आदेशच रद्द

मुंबई : राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. आमदार पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो लिमिटेड कंपनीचे 2 उत्पादन युनिट बंद करण्याबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेला आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आहे. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने 16 ऑक्टोबरला याबाबतचा आदेश राखून ठेवला होता. (Bombay High Court sets aside closure order of the MPCB against manufacturing units of Baramati Agro Ltd)

बारामती ॲग्रोमधील औद्याोगिक प्रकल्पाकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत आहे, असा दावा करत 27 सप्टेंबरला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कंपनीला नोटीस पाठवली होती. यात 72 तासांत दोन प्लांट बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर रोहित पवार यांनी या प्रकरणी उच्च न्यायालयाने धाव घेतली होती. यावर 29 सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत रोहित पवार यांना दिलासा देत नोटिशीला 6 ऑक्टोबरपर्यंत स्थगिती देत कारवाई न करण्याचे निर्देश न्यायालयाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. त्यानंतर 16 ऑक्टोबरपर्यंत ही मुदत वाढविण्यात आली होती.

 

बारामती ॲग्रोमधील औद्याोगिक प्रकल्पाकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन होत आहे. त्याबाबतचे पुरावेही आपल्याकडे आहेत. त्यामुळे, हा प्रकल्प बंद करण्याच्या नोटिशीला दिलेली अंतरिम स्थगिती उठवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबई उच्च न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने ही मागणी खोडून काढत रोहित पवार यांच्या बाजूने निकाल दिला आहे.

NDA कॅडेटचा डोक्याला मार लागल्याने मृत्यू; महिनाभरताच सैन्यात होणार होता अधिकारी

बारामती इथे बारामती ॲग्रो हा रोहित पवार यांच्या मालकीचा उद्योग आहे. शेतीशी निगडीत अनेक वस्तू येथे तयार होतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हा कारखाना वादात सापडला आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने रोहित पवार यांना काल पहाटे 2 वाजता नोटिस पाठवून हा कारखाना बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या. खुद्द रोहित पवार यांनी या संदर्भात ट्वीट करून माहिती दिली होती. घाणेरडे राजकारण असून या विरोधात लढत राहणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती.

रोहित पवार ट्विटमध्ये काय म्हणाले होते?

रोहित पवार म्हणाले होते की, राज्यातील दोन बड्या नेत्यांच्या सांगण्यावरून कुठला तरी द्वेष मनात ठेऊन पहाटे दोन वाजता राज्य शासनाच्या एका विभागाच्या माध्यमातून माझ्या कंपनीच्या एका विभागावर कारवाई करण्यात आली. संघर्ष करतांना भूमिका घेतांना अनेक अडचणींचा सामना करावाचा लागतो. मी बोलतो, ठोस भूमिका घेतो म्हणून मला अडचणीत आणण्यासाठी आता प्रयत्न सुरू झाले, असा आरोप रोहित पवारांनी केला होता.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube