मंत्री दीपक केसरकरांची दांडी; विधानसभेत विरोधकांचा गोंधळ

मंत्री दीपक केसरकरांची दांडी; विधानसभेत विरोधकांचा गोंधळ

Budget Session : विधानसभेत सत्ताधारी मंत्र्यांच्या गैरहजेरीचा मुद्दा वारंवार उपस्थित होत आहे. मंत्री उपस्थित राहत नसल्याने विरोधी पक्षनेते अजित पवारांसह (Ajit Pawar) अन्य विरोधी नेत्यांनी याआधीही सरकारला जाब विचारला होता. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्र्यांना समज देऊ असे सांगितले होते. त्याचाही फरक दिसला नाही. आज पुन्हा मंत्री दीपक केसरकर सभागृहात उपस्थित नसल्याने जोरदार राडा झाला.

वाचा : फडणवीसांचा शब्द पाण्यात, अजितदादांनी भातखळकरांना फटकारले.. 

मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी नाराजी व्यक्त केली. संबंधित मंत्री मला पायऱ्यांवर भेटले असे अजित पवार म्हणाले. त्यापाठोपाठ केसरकरांनी आपली बैठक असल्याचे कळवल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितले. त्यावर तुम्हीच त्यांना सवलत देत आहात असे म्हणत अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.

सर्वज्ञानी संजय राऊत थोडी तरी लाज बाळगा, हा मुर्खपणा; चित्रा वाघांनी राऊतांना सुनावलं..

विधिमंडळ अधिवेशनात (Budget Session) याआधीही मंत्र्यांच्या गैरहजेरीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली होती. विशेष म्हणजे, खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना आश्वासन दिल्यानंतरही मंत्री सभागृहात उपस्थित नव्हते. इतकेच काय तर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) ठराव मांडत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह बरेचसे मंत्री हजर नव्हते. त्यावरून विरोधी पक्षातील नेत्यांचा चांगलाच संताप झाला होता.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनीही संतप्त प्रतिक्रिया दिल्यानंतर भाजपनेही उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) उपस्थितीचा मुद्दा मांडताच अजित पवारांना भाजप नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. विधिमंडळात अजित पवार ठराव मांडत असताना सत्ताधारी बाकांवर मंत्रीच हजर नसल्याचे धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले होते.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube