वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, आई-वडिलांवर गुन्हा दाखल

वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या अडचणी वाढल्या, आई-वडिलांवर गुन्हा दाखल

IAS Pooja Khedkar : वादात सापडलेल्या आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा आणि वडील दिलीप यांच्यासह सात जणांवर पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pooja Khedkar) दरम्यान, आयपीसीच्या कलम 323, 504, 506 अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे. (Manorama Khedkar) तसंच, शस्त्रास्त्र कायद्याच्या आरोपांचाही समावेश करण्यात आला आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

बायडेन यांनी कहरच केला.. कट्टर शत्रूलाच बनवले मित्र नाटो; समिटमध्ये नक्की काय घडलं?

दिपाली यांचे वडील दिलीप हे महाराष्ट्र शासनाचे निवृत्त अधिकारी आहेत. खेडकर कुटुंबीयांनी बाऊन्सरच्या मदतीने शेजारील शेतकऱ्यांची जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना धमकावलं, असा दावा स्थानिकांनी केला आहे. मनोरमा बळजबरीने त्यांची जमीन हडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा शेतकरी कुलदीप पासलकर यांनी केला आहे.

दिल्लीत फिरली तपासाची चक्रे, दोषी आढळल्या तर थेट नारळ; पूजा खेडकर प्रकरण नव्या वळणावर

जमिनीच्या वादातून शेतकऱ्याला शिवीगाळ, मारहाण , धमकावणं तसंच, दमदाटी करत जीवं मारण्याची धमकी देत शेतकऱ्यांवर पिस्तूल रोखल्याच्या आरोपांच्या कलमांखाली पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. पूजा यांचे वडील दिलीप खेडकर, आई मनोरमा यांच्याबरोबर अंबादास खेडकर आणि अनोळखी दोन महीला, दोन पुरुष आणि गुडांच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षी पूजा यांच्या आईने मुळशी मधील शेतकऱ्याला धमकी देत त्यावर पिस्तूल रोखल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर संबधित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube