CET देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 4 लाखाने वाढली ; PCM च्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक

महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणाऱ्या CET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 4 लाखाने वाढली आहे.

Untitle (46)

CET Exam : महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे 2026- 27 या शैक्षणिक वर्षासाठी घेण्यात आलेल्या CET परीक्षा संपल्या आहे. राज्यातील 16 लाख 29 हजार 484 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा (CET Exam ) दिली. गेल्या वर्षी 12 लाख 46 हजार 192 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली होती. त्यामुळे यंदा सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 3 लाख 83 हजाराने वाढ झाली आहे. एकट्या पीसीएम सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 7 लाख 39 हजार 117 एवढी आहे.

सीईटी सेलतर्फे 24 मार्च 2026 ते 23 मे 2026 दरम्यान 20 परीक्षा घेण्यात आल्या आहेत. जेईई मेन्स परीक्षेच्या धरतीवर यंदा प्रथमच राज्यात दोनदा सीईटी परीक्षा घेण्यात आली. मात्र, ही परीक्षा दोन वेळा झाली असली तरी ती एका मागे एकच घेण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोनदा परीक्षा घेऊनही फारसा अभ्यासासाठी वेळ मिळाला नाही.

Idris Naikwadi Vs Parth Pawar : राजीनामा नाट्यात पार्थ अन् नायकवडी का झालेत आक्रमक?

विद्यार्थ्यांना एकच परीक्षा देणे बंधनकारक होते. मात्र, परीक्षा दिलेल्या दोन्ही मधील ज्या परीक्षेच्या निकालात अधिक परसेंटाइल असेल तो निकाल प्रवेशासाठी ग्राह्य धरला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले. पीसीएम ग्रुपच्या दुसऱ्या सीईटीसाठी 2 लाख 85 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, तर पीसीबी ग्रुपचा लाभ 95 हजार 634 विद्यार्थ्यांनी घेतला. दोन्ही पीसीबी मिळून 3 लाख 59 हजार 840 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

केडगाव दुहेरी हत्याकांड दगडफेक प्रकरण : दिवंगत माजी आमदार अनिल राठोंड यांच्यासह शिवसैनिक निर्दोष

एमबीएसाठी एक लाख 57 हजार 637 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली तर तीन वर्ष एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 69 हजार 473 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. बीएड प्रवेशासाठी 99570 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बीबीए /बीसीए/ बीएमएस/ बीबीएम अभ्यासक्रमासाठी 62 हजार 321 विद्यार्थ्यांनी सिटी दिली आहे. एमसीए साठी 53 हजार 256, नर्सिंग साठी 43 हजार 283, एलएलबी पाच वर्ष अभ्यासक्रमासाठी 29 हजार 288 विद्यार्थ्यांनी सीईटी परीक्षा दिली आहे.

Onion Price : शेतकऱ्यांना दिलासा; आजपासून 1580 रूपये प्रति क्विंटल दराने होणार कांदा खरेदी

2023- 24 या शैक्षणिक वर्षात सीईटी देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 9 लाख 37 हजार 513 होती. 2024-25 मध्ये ही संख्या 11 लाख 80 हजार 781 एवढी झाली. 2025-26 मध्ये म्हणजेच मागील वर्षी ही संख्या 12 लाख 46 हजार 192 पर्यंत गेले. यावर्षी सीईटी परीक्षा देणारे विद्यार्थी 16 लाख 29 हजार 484 एवढे आहेत.

follow us