CM फडणवीस…धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील, भाजप नेत्याने फोडला बॉम्ब

CM फडणवीस…धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला सांगतील, भाजप नेत्याने फोडला बॉम्ब

Chandrakant Patil on Dhananjay Munde Resjgnation : मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी सातत्याने होतेय. यावर आता भाजपा (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांची प्रतिक्रिया समोर आलीय. मस्साजोगचे सरपंच यांच्या हत्येला जवळपास दिड महिना उलटलाय. परंतु या प्रकरणातील एक आरोपी अजून फरारच आहे. अटक केलेल्या आरोपींना काही कडक शासन होत नसल्याचा आरोप बीड (Beed) जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी करत असल्याचं समोर येतंय.

तसंच या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडेंच्या विरोधकांकडून केली जातेय. या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं, अशी मागणी मोठ्या प्रमाणावर होत आहे. यावर आता भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया समोर आलीय. त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाष्य केलंय.

बजेटपूर्वीच सरकारची मोठी घोषणा, ‘या’ लोकांना होणार बंपर फायदा, 1 एप्रिलपासून लागू होणार UPS योजना

चंद्रकांत पाटील सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत असताना त्यांनी याप्रकरणी भाष्य केलंय. ते म्हणाले की, संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सुरू आहेत. निर्णय घेण्यासाठी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेण्यासाठी समर्थ आहे. जर प्रकरणात तथ्य आहे, असं त्यांना वाटलं तर ते लगेच धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील.

सत्तेचा वापर…कराडला सोडवण्यासाठी षडयंत्र सुरू; मनोज जरांगेंनी केला खळबळजनक खुलासा

पोलीस यंत्रणा हत्या प्रकरणाची चौकशी करतेय. याप्रकरणी एसआयटी देखील नेमण्यात आलीय. निवृत्त न्यायाधीशांची समिती देखील नेमलीय. वाल्मिक कराडसोबत इतर आरोपींना देखील मकोका लावण्यात आलाय. कराडची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube