बावनकुळेंकडून आदेश निघाले! 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा; जिल्ह्या-जिल्ह्यात जल्लोष करा!
नागपूर : नव्या सरकारचा शपथविधी 5 डिसेंबर रोजी मुंबईतील आझाद मैदानावर पार पडणार आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी भाजप आमदारांना दिली आहे. ते भाजप आमदारांशी आयोजित ऑनलाईन VC बैठकीत बोलत होते. यावेळी त्यांनी नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीवेळी जिल्ह्याजिल्ह्यात जल्लोष करा अशा सूचनाही दिल्या आहेत. बावनकुळेंच्या आमदारांना दिलेल्या या सूचनांमुळे आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधीची तारीख जवळपास निश्चित मानली जात आहे. प्रत्येक जिल्ह्यातून महत्त्वाचे पदाधिकारी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहतील. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव पास असणाऱ्या व्यक्तींनाच आझाद मैदानात प्रवेश दिला जाणार असल्याचे बावनकुळेंनी स्पष्ट केलं. (Chandrashekhar Bawankule On New CM Oath Ceremony)
“मीडियासमोर वक्तव्य करून निर्णय होत नाही”, गृह खात्याच्या मागणीवर भाजपाचं प्रत्युत्तर
मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीसांचे नाव आघाडीवर
महायुतीला दणदणीत यश मिळून देखील अद्याप सरकार स्थापनेच्या हलचाली झाल्या नाहीत. याआधीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे होते. आता नव्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण असणार याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, मुख्यमंत्रीदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र, अद्याप भाजपकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु, आता भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी नव्या सरकारचा शपथविधी सोहळ मुंबईतील आझाद मैदानावर 5 डिसेंबर रोजी होणार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता शपथविधीची तारीख निश्चित झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ नेमकं कोण घेत याकडे सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत.
EVM हॅक करता येतं I Know दॅट, आयएम अल्सो द इंजिनिअर; जानकरांच्या दाव्याने खळबळ
संघाच्या कोअर कमिटीची बैठक
सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोअर कमिटीकडूनही महत्त्वाची बैठक घेतली जात आहे. त्यामुळे, राज्यातील सरकार स्थापनेपूर्वी हालचाली गतीमान झाल्या असून भाजपकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार हे लवकरच स्पष्ट होईल.
विजयात आमचा मोठा वाटा; आम्हाला गृह खाते देण्यास विरोध का?
राज्यात नव्याने अस्तित्वात येणाऱ्या सरकारमध्ये मुख्यमंत्रीपद भाजपकडेच राहणार असल्याने एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. त्यात एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. मात्र, शिंदे सध्या त्यांच्या मुळ गावी गेले असून, तेथून परतल्यावर शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे संकेत शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी दिले आहेत. त्यामुळे आता शिंदेंच्या मनात नेमकं काय? असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे.
तर, दुसरीकडे संजय शिरसाट यांनी महायुतीच्या विजयात आमचा मोठा वाटा आहे असे म्हणत आम्हाला गृहखातं देण्यास विरोध का? असा सवाल केला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाहीत हे निश्चित आहे. त्यांची राज्यात कॉमन मॅन म्हणून ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे दिल्लीला जाणं शक्य नाही. ते उपमुख्यमंत्रीपदावरील आपली भूमिका आज सायंकाळपर्यंत स्पष्ट करतील असा अंदाज आहे.
माझ्या पाठीमागे शनी होता, मी शनीची पूजा करून आलो, बबनराव लोणीकरांनी दानवेंना काढले चिमटे
मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडलेला नाही
शिरसाट म्हणाले की, शिंदे हे फकीर टाईप माणूस आहेत. ते काय सोडतील व काय घेतील? याचा काहीही अंदाज बांधता येत नाही. कदाचित ते उपमुख्यमंत्रीपद स्वीकारतील किंवा स्वीकारणारही नाही. यासंबंधी कोणताही अंदाज बांधता येत नाही. कदाचित हे पद शिंदेंऐवजी अन्य एखाद्या नेत्याला दिलं जाईल. पण शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद मिळणार असेल तर आम्ही ते अजिबात सोडणार नाही. शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडला नसल्याचंही ठणकावून सांगितलं. आम्ही मुख्यमंत्रीपदावरील दावा अद्याप मागे घेतला नाही. भाजपला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून आम्ही यासंबंधीचा निर्णय भाजपच्या नेतृत्वावर सोपवला आहे, असंही ते म्हणाले आहेत.