गाली तो गहना बनाना मोदीजी की आदत, जनता काँग्रेसला धडा शिकणार; राहुल गांधींना कोणी सुनावलं?
Chandrashekhar Bawankule Slammed Rahul Gandhi: लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार हल्लाबोल सुरु आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सोलापूरमध्ये (Solapur) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्यावर जोरदार टोला लगावला आहे. मात्र त्यांचं वक्तव्य भाजप नेत्यांना रुचलं नसून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी राहुल गांधी यांना (Rahul Gandhi) प्रत्युत्तर दिलं.
सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते @RahulGandhi मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी… pic.twitter.com/WbteZuanCx
— Chandrashekhar Bawankule (Modi Ka Parivar) (@cbawankule) April 26, 2024
चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्स या सोशल मिडीयावर पोस्ट करत राहुल गांधींवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात म्हटले आहे की, सोलापुरात येऊन काँग्रेसचे नेते राहुल गांधी मोदीजींबद्दल एकेरी उल्लेख करतात. देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीबद्दल राहुल गांधींची (Rahul Gandhi) ही भाषा शोभणारी नाही. त्यांनी औकातीत राहावं. लोकसभा निवडणुकीत मोदीजींना मोठ्या प्रमाणात जनसमर्थन मिळत असल्यामुळे राहुल गांधी मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण जनता मोदीजींच्या पाठीशी आहे.
सही करण्यापूर्वी विचार करा; वरिष्ठ नेत्यांची पाठ फिरताच विशाल पाटलांचा दिल्लीश्वरांशी पंगा
गाली को गहना बनाना मोदीजी की आदत है. तुम्ही कितीही एकेरी उल्लेख केले, शिव्याशाप दिल्या तरी मोदीजींना पराभूत करू शकत नाहीत. कधी मौत का सौदागर, तर कधी चोर म्हणून मोदीजींना हिणवलं पण प्रत्येकवेळी जनतेनं मतदानातून काँग्रेसला धडा शिकवला.
निवडणुकीत पराभवाच्या भीतीनं राहुल गांधींच्या पायाखालची वाळू सरकली. त्यामुळे महाराष्ट्रात येऊन मोदीजींचा एकेरी उल्लेख करत आहेत. पण राहुल गांधींनी लक्षात ठेवावं मोदीजींच्या एकेरी उल्लेखानंतर राज्यात एकही जागा काँग्रेसला मिळणार नाही.