स्वबळाचा नारा देत छगन भुजबळांचा राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा; आपली मतं कमी करण्याचा डाव अन्…

Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत 26 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पाडली. खासदार

Chhagan Bhujbal

Chhagan Bhujbal : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत 26 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पाडली. खासदार सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, पार्थ पवार यांच्या उपस्थितीत पार पडलेली ही बैठक वादळी ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. या बैठकीत सुनील तटकरे यांनी त्यांच्यावर आणि प्रफुल पटेल यांच्यावर होणाऱ्या टिकेवर आपली भूमिका स्पष्ट करत पक्षाचा एकही नेता आपली बाजू घेत नसल्याने नाराजी व्यक्त केली.

तर दुसरीकडे या बैठकीत सुनील तटकरे (Sunil Tatkare) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात शाब्दिक चकमक देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. तर या बैठकीत बोलताना छगन भुजबळ यांनी 2029 विधानसभा निवडणुकीसाठी (2029 Assembly Elections) स्वबळाचा नारा दिला आहे. 2029 च्या निवडणुकीसाठी भाजप काय भूमिका घेणार हे माहिती नाही. त्यापेक्षा आपण 288 जागांची तयारी करायला हवी. तसेच मतदार संघ वाढत असतील तर त्याबाबत देखील आगामी प्लानिंग करायला हवी. सध्या राबवण्यात येणारी एसआयआर मोहीम ही एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून आपल्याला मिळणारी मतं कमी करण्याचा डाव आखला आहे. त्यामुळे यावर आपण वेळीच उपायोजना करायला हवी असं या बैठकीत मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

पक्षाची बदनामी नको- सुनेत्रा पवार

तर दुसरीकडे या बैठकीत पक्षाची बदनामी करणाऱ्यांना सडेतोड उत्तर द्या आणि पक्ष एकसंघ असल्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवा अशा सूचना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना दिल्या आहे. तसेच या बैठकीत त्यांनी 22 आमदार पक्षाची साथ सोडणार या चर्चांमुळे पक्षाची बदनामी होत आहे असं म्हटलं आहे.

मराठी ZEE 5 वर “सुपर डुपर” चित्रपट ‘या’ दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तसंच सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यासह पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा योग्य सन्मान राखला जाईल असं देखील सुनेत्रा पवार यांनी या बैठकीत स्पष्ट केलं असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us