Video : आयकरचा अधिकारी सांगून थेट भुजबळांवरच टाकलं जाळ; पण.. स्वत:च अडकला, काय घडलं?

Video : आयकरचा अधिकारी सांगून थेट भुजबळांवरच टाकलं जाळ; पण.. स्वत:च अडकला, काय घडलं?

Chhagan Bhujbal’s fraud : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ यांना ‘इन्कम टॅक्स अधिकारी’ असल्याचं सांगून एक कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना घडली आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथील फार्महाउसवर आयकर विभागाची रेड पडणार आहे, त्या टीममध्ये मी आहे. तुम्हाला मदत हवी असल्यास एक कोटी रूपये द्यावे लागतील. अशाप्रकारे संवाद साधून खंडणीची रक्कम पेठ तालुक्यातील करंजाळीजवळ स्वीकारली असता नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने रंगेहात पकडलं आहे. राहुल दिलीप भुसारे (२७, रा. करंजाळी) असं अटक केलेल्या संशयिताचं नाव आहे.

राहुल याने भुजबळांना पहिल्यांदा २३ एप्रिल रोजी संपर्क साधला. हा क्रमांक भुजबळ यांचे स्वीय सहायक फिर्यादी संतोष गायकवाड यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट केलेला असल्याने त्यांनी कॉल घेतला. यावेळी राहुल याने स्वत:ला आयकर विभागाचा अधिकारी सांगून सुरूवातीला १ कोटी ६० लाख रूपयांची मागणी केली. यानंतर पुन्हा २ मे रोजी संपर्क साधून तडजोड करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना जास्त रक्कम द्यावी लागेल, असं सांगून १ कोटी रूपयांची खंडणीची मागणी केली.

Video : ..तर हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते,पण.. संजय राऊतांचा खळबळजनक दावा काय?

हा प्रकार गायकवाड यांनी थेट पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांना सांगितला. यानंतर गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना याबबत कर्णिक यांनी सुचना देऊन तातडीने कारवाईचे आदेश दिले. गुन्हे शाखा युनिट-१चे पोलिस निरिक्षक मधुकर कड यांनी याप्रकरणी दोन पथके तयार केली. एका पथकाने गुजरात गाठले. धरमपूर येथे राहुल हा पैसे घेण्यासाठी आला नाही. त्याने करंजाळी येथे बोलविले. त्यावेळी पथकाने करंजाळी गाठली. तेथे पैशांची बॅग त्याने स्वीकारली असता गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतलं. त्याच्याविरूद्ध अंबड पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पंधरा दिवसांपूर्वी एक फोन आला. आमच्या पीएसोबत ते बोलले. त्यावेळी त्यांनी मी इनकम टॅक्स ऑफिसर आहे. दरम्यान, तुमच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्महाऊसवर रेड पडणार असून तुम्हाला यातून वाचवण्यासाठी मदत करू शकतो. तुम्ही एक कोटी द्या असं म्हणाला. मात्र, त्र्यंबकेश्वरला आमचं कोणत फार्महाऊसच नाही. जे काही आहे त्यावर दहा-बारा वेळा धाड पडली. त्यामध्ये काही सापडलं नाही. मग आम्हाला वाटलं काहीतरी गडबड आहे. मग आमचे पीए बोलतच राहीले आणि अखेऱ त्याला अटक झाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube