छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकाच अमानवी कृत्य; अंधाराचा फायदा घेत तीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार

वर्षांपासून खासगी शिकवणी (ट्यूशन) घेतो. याच परिसरात राहणारी तीनवर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळी रडत आई- वडिलांकडे गेली.

  • Written By: Published:
Chhatr[ati

छत्रपती संभाजीनगरमधून शिक्षकाच्या पेशाला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. (Beed) येथील पदमपुरा परिसरात एका विकृत खासगी शिकवणी घेणाऱ्या ५५ वर्षीय शिक्षकाने तीनवर्षीय चिमुकलीवर अत्याचार केला. येथील वेदांतनगर परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने पोलिसांना मध्यरात्री गुन्हा दाखल झाला नव्हता. आज उशिरा ०२:०० वाजेपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

पदमपुरा परिसरात एक व्यक्ती काही वर्षांपासून खासगी शिकवणी (ट्यूशन) घेतो. याच परिसरात राहणारी तीनवर्षीय चिमुकली मंगळवारी सायंकाळी रडत आई- वडिलांकडे गेली. पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर तिने तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. एकाच परिसरात असल्याने चिमुकली व संशयित आरोपीचा एकमेकांच्या ओळखीचे होते.

प्रेम केलं अन् जातीमुळे…छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार उघड

स्थानिकांच्या माहितीनुसार, त्या शिक्षकाने मुलीला बोलावून घेतलं. एकाच परिसरातील असल्याने चिमुकलीदेखील त्याच्याकडं सहज गेली. त्यानंतर संशयिताने हा विकृतपणा केला. घटनेची माहिती कळताच चिमुकलीच्या कुटुबीयांसह स्थानिकांचा मोठा जमाव वेदांतनगर पोलीस ठाण्यात दाखल झाला. मात्र, वीजपुरवठा खंडित झाल्याने याप्रकरणी प्रक्रिया पार पाडण्यास विलंब झाला.

संशयिताचं नाव जीवनवाल असून, त्याचं वय साधारण ५५ असल्याचं पोलीस ठाण्यात उपस्थित ॲड. पंकज बनसोडे यांनी सांगितलं. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री ०२:०० वाजेनंतरही सुरू असल्याचं वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

follow us