लघुशंकेसाठी गाडीखाली उतरला अन् भरधाव हायवाने चिरडलं; भाऊ-वडिलांच्यासमोर तरुणाचा मृत्यू
Chhatrapati Sambhajinagar Accident : धुळे सोलापुर महामार्गावरील आडगाव जवळ मोठ्या अपघाताची घटना घडली. उपचारांसाठी भाऊ, वडिलांसह शहरात येत असलेल्या गेवराई तालुक्यातील (Accident ) सचिन भागवत पानखेडे (३१) या तरुणाचा सुसाट हायवाखाली चिरडून मृत्यू झाला. सोमवारी सकाळी धुळे सोलापुर महामार्गावरील आडगाव जवळ हा अपघात झाला.
मुळ गेवराई तालुक्यातील राजपिंपरीचे रहिवासी असलेले सचिन शेती करत असे. गेल्या काही दिवसांपासून सचिन यांची प्रकृती खराब होती. स्थानिक रुग्णालयांमध्ये अपेक्षित उपचार होत नसल्याने त्यांनी छत्रपती संभाजीनगरात रुग्णालयातील डॉक्टराकडे उपचार घेण्याचं ठरवलं होतं. सचिन, त्याचे वडिल व चुलत भावासह कारने सकाळी सोलापुर ते धुळे महामार्गाने छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघाले. ते झाल्टा फाटाच्या पूर्वी लागणाऱ्या आडगाव उड्डाणपुलाजवळील सर्व्हिस रोडवर लघुशंकेसाठी त्यांनी कार रस्त्याच्या कडेला उभी केली. लघुशंका करुन पुन्हा कारच्या दिशेने जात असताना सुसाट वेगात आलेल्या हायवा चालकाने सचिनला जोरात धडक दिली.
Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान
चालक फरार
हायवाचा वेग इतका होता कि, जवळपास ७० ते ८० फुट सचिनला चिरडत नेले. मोठा आवाज झाल्याने स्थानिकांनी धाव घेतली. डोके, छातीला गंभीर दुखापत झाल्याने सचिनचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच चिकलठाणा पोलीस ठाण्याचे अंमलदार सुनिल सुरसे यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. चालक हायवा सोडून पसार झाला. त्याचा शोध सुरू असल्याचे सुरसे यांनी सांगितलं.