सलग दुसऱ्या रात्री अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर संघर्ष सुरू, चार जण ठार तर 80 हून अधिक जखमी

Afghanistan Pakistan Clash : आफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. सलग दुसऱ्या रात्री देखील आफगाणिस्तान

  • Written By: Published:
Afghanistan Pakistan Clash

Afghanistan Pakistan Clash : आफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरु झाला आहे. सलग दुसऱ्या रात्री देखील आफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सैन्यात कंधार प्रांतातील स्पिन बोल्दाक येथे भीषण संघर्ष पाहायला मिळाला. या सघर्षामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर सुमारे 80 जण जखमी झाले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानवर विनाकारण हल्ला केल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे दोन्ही देशांमध्ये वाढता संघर्ष पाहता सीमावर्ती भागात हजारो लोकांना अन्न आणि वैद्यकीय साहित्याचा तुटवडा जाणवत आहे. अफगाण सैन्याने पाकिस्तानमधील (Afghanistan Pakistan Clash) मजल गली आणि लुकमान गावांमध्ये मोर्टार डागले, घरांना आग लावली आणि लोकांना जीव वाचवण्यासाठी पळून जाण्यास भाग पाडले, असे आरोप आहेत. दोन्ही देशांनी आता लोकांना सीमावर्ती भागातून बाहेर काढण्याचे आदेश दिले आहेत.

शांतता चर्चा अयशस्वी

पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे प्रवक्ते मुशर्रफ झैदी यांनी सांगितले की गेल्या आठवड्यात अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील शांतता चर्चा अयशस्वी झाली. दोन दिवसांनंतर, 5 डिसेंबरच्या रात्री, अफगाण सैन्य आणि तालिबानी दहशतवाद्यांनी ड्युरंड रेषेवर गोळीबार केला. त्यांनी स्लिप बोल्दाक भागात पाकिस्तानी सैन्याला लक्ष्य केले, नंतर रॉकेट आणि मोर्टार डागले. पाकिस्तानी सैन्याने गोळीबाराने प्रत्युत्तर दिले. 7 डिसेंबरच्या रात्रीही अशीच चकमक झाली.

पाक-अफगाण मैत्री गेटचेही नुकसान

काल रात्री झालेल्या चकमकीत बलुचिस्तानला कंधारशी जोडणाऱ्या मैत्री गेटचे नुकसान झाले. दोन्ही बाजूंनी रॉकेट डागण्यात आले, ज्यामुळे गेट उद्ध्वस्त झाले आणि कर्मचाऱ्यांना पळवून लावण्यात आले. त्यानंतर गोळीबार आणि तोफगोळ्यांनी गावांना लक्ष्य करण्यात आले. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर म्हणाले की जर अफगाणिस्तानला युद्ध हवे असेल तर पाकिस्तान तयार आहे.

9 ऑक्टोबरपासून दोन्ही देशांमधील संघर्षाची परिस्थिती

9 ऑक्टोबर रोजी ड्युरंड रेषेवर दोन्ही देशांमधील चकमक झाली. पाकिस्तानी सैन्याने अफगाणिस्तानात हवाई हल्ले केले, ज्यात तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानच्या जागा लक्ष्य केल्या. अफगाणिस्तानने प्रत्युत्तर देत याला युद्धाची घोषणा म्हटले आणि पाकिस्तानवर हल्ला केला.

Bigg Boss 19 चा विजेता घोषित ? विकिपीडियाने ‘या’ फायनलिस्टला विजेता घोषित केले

अनेक दिवसांच्या संघर्षानंतर, दोन वेळा तात्पुरत्या युद्धबंदीची स्थापना झाली, परंतु तिसऱ्यांदा शांतता चर्चा अयशस्वी झाल्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

follow us