”शिंदेंकडे आलेल्या सहा खासदारांना भाजपात यायचं होतं पण आम्ही दार उघडलं नाही”
CM Devendra Fadanvis यांनी एका डिजीटल वाहिनीला मुलाखत देताना सहा खासदारांच्या भाजपप्रवेशावर मोठा गौप्यस्फोट केला आहे.
CM Devendra Fadnavis revelation about UBTs 6 Rebel MP joining BJP : उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर त्यांनी शिंदेंच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील वायबी सेंटरमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या खासदारांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. यावर आता स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका डिजीटल वाहिनीला मुलाखत देताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?
गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये चर्चेत असलेल्या ऑपरेशन टायगर दरम्यान वारंवार केंद्रातील अमित शाह आणि राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याभूमिकेवर प्रचंड चर्चा झाली. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील खासदार फुटल्यानंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. मात्र यावर प्रश्न विचारला असता देवेंद्र फडणवीसांनी हा दावा फेटाळून लावला. तसेच त्यांनी यावेळी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
इंडियन आयडॉल च्या मंचावर पुन्हा जाण हे घरी जाण्यासारख वाटतं – अभिजीत सावंत !
यावेळी बोलतानैा देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरेंच्या 6 खासदारांपैकी एक-दोन जणांनी भाजपमध्ये त्यांना प्रवेश दिला जावा अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र आम्ही म्हणजे भाजपने त्यांच्यासाठी दारं बंद ठेवली. कारण आमचं मत होत की, त्यांचा मूळ पक्ष हा शिवसेना आहे. ते शिवसेनेमधून निवडून आलेले आहेत. त्यामुळे त्यांनी शिवसेनेत जावं. तसेच त्यांना आमच्या पक्षात घेण्यासाठी आमच्याकडे सध्या काही तशी व्यवस्था नाही.