‘…थोडं दु:ख होतंय, पण ठीक!’ दिल्लीच्या बैठकीवरून CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला

Devendra Fadnavis Criticize Uddhav Thackeray : दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक (India Aghadi Delhi meeting) पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांना (Uddhav Thackeray) मागच्या रांगेत बसवण्यात आलंय. त्यावर भाजप नेते जोरदार टीका करत आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (CM Devendra Fadnavis) प्रतिक्रिया दिली आहे. आमच्याकडे नेहमीच पहिल्या रांगेत ते राहिले, आमच्यापेक्षा देखील आधी ते राहिले. तिथे (इंडिया आघाडी) त्यांचा काय मानसन्मान आहे, तो आपल्या लक्षातंच आलेला आहे, अशी टीका फडणवीसांनी केलीय.
आमच्याकडे नेहमीच पहिल्या रांगेत
खूप म्हणायचं दिल्लीसमोर झुकणार नाही, दिल्लीसमोर पायघड्या (Maharashtra Politics) टाकणार नाहीत. परंतु आता दिल्लीत काय परिस्थिती आहे? हे बघितल्यानंतर थोडं दु:ख होतंय, पण ठीक आहे. असा टोला देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांसमोर उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
दिवसाढवळ्या टाकलेला दरोडा! जबाबदारी लोकप्रतिनिधींची…सिस्पेवरून सुजय विखेंचा खासदार लंकेंवर निशाणा
राहुल गांधी यांना नेमकं काय हवं?
राहुल गांधींच्या वक्तव्यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, अलिकडच्या काळात राहुल गांधी यांनी सलीम जावेद यांच्याशी संपर्क साधून एक स्क्रिप्ट लिहून घेतली आहे. अतिशय मनोरंजनात्मक प्रकारची ही स्क्रिप्ट आहे. ती सगळीकडे ते मांडत आहे. याच्याने केवळ मनोरंजन होत आहे. सगळ्या गोष्टी कपोलकल्पित ते मांडत आहेत. एकीकडे ते म्हणतात, मतदार यादीत गोंधळ आहेत. राहुल गांधी यांना नेमकं काय हवं आहे? त्यांना केवळ आपल्या हरण्यामागील कारण शोधून काढायचं आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.
रेव्ह पार्टी प्रकरणी एसआयटी…
पेटाने एवढंच बघितलं पाहिजे, हत्तीण सुरक्षित आहे की नाही. जर आम्ही त्या सर्व सुरक्षा कोल्हापूरला करत आहोत, तर हत्तीण कुठे ठेवायची, याचा आग्रह पेटाने करू नये. हत्तीण कुठे ठेवायची, हे पेटाने आम्हाला सांगू नये, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. तर एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या रेव्ह पार्टीच्या प्रकरणात एसआयटी स्थापन होणार का, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की, पोलिसांनी न्यायालयात से सादर केला होता. ज्यातील पुराव्यांमध्ये काही व्हिडिओ, आक्षेपार्ह फोटो आहेत. त्यामुळे याप्रकरणी पुढील निर्णय पोलीसच करतील.