Video एक बिस्किट्स घेऊ? समय रैनाच्या प्रश्नावर फडणवीसांचं उत्तर अन् एकच हशा पिकला

Comedian Samay Raina on Devendra Fadanvis ‘डिजिटल अरेस्ट’ या विषयावर आधारित ‘ऑपरेशन 1930’ या जनजागृतीपर चित्रपटाचा ट्रेलर आला

Comedian Samay Raina On Devendra Fadanvis

Comedian Samay Raina on Devendra Fadanvis in unveiled trailer of movie ‘Operation 1930’ ‘1930 Cyber ​​Anthem’ : सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘डिजिटल अरेस्ट’ या विषयावर आधारित ‘ऑपरेशन 1930’ या जनजागृतीपर चित्रपटाचा ट्रेलर आणि **‘1930 सायबर अँथम’**चे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 26 ऑगस्ट रोजी करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, महाराष्ट्र सायबरचे ब्रँड ॲम्बेसेडर अभिनेते शरद केळकर, जावेद जाफरी, आशिष विद्यार्थी, पंकज त्रिपाठी, सोनाली बेंद्रे, अभिषेक बॅनर्जी, मंगेश देसाई, गायिका सुनिधी चौहान आणि कॉमेडियन समय रैना यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

समय रैनाच्या कृतीने कार्यक्रमात हशा

कार्यक्रमादरम्यान समय रैनाची एक मजेशीर कृती चर्चेचा विषय ठरली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते समय रैनाचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी पुढे आला असता, त्यांच्या समोर ठेवलेल्या बिस्किटांकडे त्याचे लक्ष गेले.समयने फडणवीस यांना थेट “मी एक बिस्किट घेऊ का?” असे विचारले. त्यावर मुख्यमंत्र्यांनीही हसत “हो, नक्कीच” असे उत्तर दिले. त्यानंतर समयने समोरचे एक बिस्किट घेतले आणि तो तेथून निघून गेला. त्याच्या या अनपेक्षित आणि मिश्कील कृतीमुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

‘फसवणूक होताच 1930 वर फोन करा’

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले. सायबर गुन्हेगार पोलीस, सीबीआय किंवा न्यायालयातील अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवतात आणि त्यानंतर पैशांची फसवणूक करतात. अशा प्रकारांना बळी न पडता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तातडीने 1930 या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे त्यांनी सांगितले.

नेपाळमध्ये अडकलेल्या साताऱ्यातील 10 महिला पर्यटक सुरक्षित; प्रशासनाकडून हेल्पलाईन क्रमांक जारी

फडणवीस यांनी सांगितले की, सायबर फसवणुकीनंतरचे सुरुवातीचे काही तास अत्यंत महत्त्वाचे असतात. या काळात तक्रार दाखल केल्यास फसवणुकीची रक्कम पुढे जाण्यापासून रोखण्याची किंवा ती परत मिळवण्याची शक्यता वाढते. मात्र तक्रार करण्यास काही दिवसांचा विलंब झाल्यास पैसे वेगवेगळ्या खात्यांमध्ये वळवले जाऊ शकतात आणि त्यांची वसुली अधिक कठीण होते.

View this post on Instagram

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

AI मुळे सायबर गुन्ह्यांचे नवे प्रकार

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वाढत्या वापरामुळे सायबर गुन्ह्यांचे स्वरूपही बदलत आहे. व्हॉइस क्लोनिंग, डीपफेक, बनावट ऑडिओ आणि व्हिडीओ यांसारख्या माध्यमांचा वापर करून नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रकार वाढत आहेत. या नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी महाराष्ट्र सायबरकडून सुरू असलेले काम महत्त्वाचे असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

‘ऑपरेशन 1930’ हा सायबर जनजागृतीपर

‘ऑपरेशन 1930’ हा 42 मिनिटांचा सायबर जनजागृतीपर चित्रपट आहे. लोकप्रिय कलाकारांच्या माध्यमातून सायबर फसवणुकीविरोधातील संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे. चित्रपटातील छोट्या क्लिप्स, शॉर्ट व्हिडीओ आणि सोशल मीडिया रील्सच्या माध्यमातूनही नागरिकांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचा संदेश दिला जाणार आहे. डिजिटल व्यवहार वाढत असताना नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद फोन, मेसेज किंवा ऑनलाइन मागणीला प्रतिसाद देण्यापूर्वी सतर्क राहणे गरजेचे आहे. फसवणूक झाल्यास वेळ न दवडता 1930 वर तक्रार करणे आणि तत्काळ कारवाई करणे, हा सायबर गुन्ह्यातील आर्थिक नुकसान कमी करण्यासाठी महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

 

follow us