प्रमोद महाजन यांना मारण्याचं षडयंत्र कुणी अन् का रचलं?, पूनम महाजन यांनी सांगितली इनसाईड स्टोरी

  • Written By: Published:
प्रमोद महाजन यांना मारण्याचं षडयंत्र कुणी अन् का रचलं?, पूनम महाजन यांनी सांगितली इनसाईड स्टोरी

Poonam Mahajan : प्रमोद महाजन यांची हत्या झाली या घटनेला १८ वर्ष झाली. परंतु, त्यांनी हत्या नक्की कोणत्या कारणाने झाली याबद्दल काही ठोस माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांची कन्या (Poonam Mahajan ) पूनम महाजन यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. प्रमोद महाजन यांनी फाईव्ह स्टार कल्चर आणल्याची टीका झाली. मात्र, त्यांची दूरदृष्टी खूप मोठी होती. प्रमोद महाजन यांची हत्या त्यांच्या भावानेच केली. त्या सगळ्याबाबत पूनम महाजन यांनी भाष्य केलं आहे.

पूनम महाजन काय म्हणाल्या?

प्रमोद महाजन यांना रुग्णालयात ठेवलं होतं ते १२ ते १३ दिवस मी कधीही विसरु शकत नाही. बाबा गेले पण ते व्यक्तिमत्व प्रखर होत गेलं हे मी अनुभवलं. बाबा जाणं म्हणजे घरातला वटवृक्ष कोसळलणं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक नेत्याला प्रमोद महाजन होऊन दिल्लीला जावंसं वाटतं. प्रमोद महाजन होण्याची इच्छा अनेकांमध्ये मी पाहिली आहे. असंही पूनम महाजन म्हणाल्या आहेत.

बाबा मैं आपका ही तो अंश हूँ! उमेदवारी नाकारल्यानंतर पूनम महाजन यांची भवनिक पोस्ट

प्रमोद महाजन यांची हत्या झाल्यानंतर खूप वेगवेगळ्या चर्चा झाल्या. कारण सनसनी निर्माण करायची असते. प्रमोद महाजनांवर एका माणसाने गोळ्या झाडल्या हे ठीक आहे. मात्र, ती गोळीही त्यांच्याच पैशांची होती, बंदुकही त्यांच्याच पैशांची होती, कदाचित त्या माणसाच्या अंगावरचे कपडे (प्रवीण महाजन) हे पण प्रमोदजींच्या पैशांचेच असू शकतात. पण बाबांना मारण्याचं डोकं फक्त एका माणसाचं असू शकत नाही. मी हे आज नाही खूप वर्षांपासून बोलते आहे. हे सत्य कधीतरी शोधलं पाहिजे. असंही त्या म्हणाल्यात.

टोकाचे वाद होते का?

प्रवीण महाजन आणि प्रमोद महाजन यांच्यातले संबंध खरंच टोकाचे झाले होते? असं विचारलं असता पूनम महाजन म्हणाल्या, ‘कुठल्याही खुनाच्या मागं कारण काय ते शोधलं जातं. त्यावेळी कोर्टात जे सांगितलं गेलं त्यावरुन हे कळलं की इतकी वर्षे सांभाळलं तरीही अजून सांभाळलं जावं असं वाटत होतं. माझा मुलगा २० वर्षांचा झाला आहे त्याला मी सांगते की तुझी तू कमाई करायला शिक. पण अशा कारणाने असं कुणी करत असेल का? भांडणातून एखादी गोष्ट ट्रिगर होऊ शकते का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

 माझ्या हयातीत समजल पाहिजे

तुम्ही (प्रवीण महाजन) प्रमोदला दादाही म्हणत नव्हतात. सरळ प्रमोद अशीच हाक मारत होतात. तुम्ही प्रमोदशी वादही घालत असायचा. काही महिन्यांपूर्वी बोललेल्या माणसावर दोन महिन्यांत इतका राग कसा येऊ शकतो? तो राग कुणी वाढवला? हे शोधणं महत्त्वाचं आहे. केनेडींवर अजूनही चर्चा होते. कदाचित प्रमोद महाजन यांच्या हत्येचं कारण कळायला वेळ लागेल. पण मला वाटतं की माझ्या हयातीत हे कारण समजलं पाहिजे असंही त्या म्हणाल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube