बस डेपो, व्यापारी संकुला अन् चार्जिंग स्टेशनचे काम गतीने पूर्ण करा; आशुतोष काळेंच्या सूचना

बस डेपो, व्यापारी संकुला अन् चार्जिंग स्टेशनचे काम गतीने पूर्ण करा; आशुतोष काळेंच्या सूचना

Complete the work of bus depot, commercial complex and charging station at the earliest; Ashutosh Kale’s instructions : कोपरगाव शहरातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी आशेचा किरण असलेल्या कोपरगाव शहरातील बस डेपो, व्यापारी संकुलाबरोबरच चार्जिंग स्टेशनचे काम शीघ्र गतीने पूर्ण करा अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव आगार प्रमुख अमोल बनकर यांना दिल्या आहेत.कोपरगाव शहराच्या एस.टी. बस आगारामध्ये सुरु असलेल्या वर्कशॉप, चार्जिंग स्टेशन व व्यापारी संकुलाची आ. आशुतोष काळे यांनी पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यावेळी कोपरगाव बस आगाराला मिळालेल्या नवीन पाच बसचे आशुतोष काळे यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात येवून लोकार्पण करण्यात आले.

एआर रेहमानवर गाणं कॉपी केल्याचा आरोप; कॉपीराईट केसमध्ये न्यायालयाने ठोठावला 2 कोटींचा दंड

यावेळी सुरु असलेल्या कामाबाबत सूचना करतांना ते बोलत होते. यावेळी आ. आशुतोष काळे म्हणाले की, व्यापारी संकुलाच्या कामाला गती देवून हे व्यापारी संकुल लवकरात लवकरात जनसेवेत रुजू करा. जेणेकरून छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना या व्यापारी संकुलाच्या माध्यमातून लवकरात लवकर व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. पुढील वर्षी नासिक येथे होणाऱ्या कुंभ मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगाव बस स्थानकातून नासिक येथे जाणाऱ्या येणाऱ्या प्रवासी बांधवांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही याची काळजी घेवून सुरु असलेली कामे वेळेत पूर्ण करा.

…तर मी स्वत: वाळूच्या गाड्या पेटवून देईल; आमदार आशुतोष काळेंचा प्रशासनाला कडक इशारा

भविष्यात इलेक्ट्रिक बस ची संख्या वाढणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त बस कोपरगाव डेपोत चार्जिंगसाठी येणार असून निश्चितच बसची संख्या वाढल्यामुळे प्रवाशांची संख्या वाढणार आहे व त्याचा परिणाम कोपरगावच्या व्यवसाय वाढीसाठी पूरक ठरणार आहे. त्यामुळे कोपरगाव बस डेपो आगारात सुरु असलेल्या बस चार्जिंग स्टेशनचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करा. कोपरगाव बस डेपोला पाच नवीन बस मिळाल्या असून अजून पाच बस मिळणार आहे त्यामुळे प्रवाशांच्या अडचणी सुटण्यास मदत होणार असून यापुढील काळातही प्रवाशांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोपरगाव बस आगाराला सर्वोतोपरी सहकार्य करणार असल्याचे आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.

Pahalgam attack: गुजरात पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; हजारहून अधिक बांगलादेशी ताब्यात

याप्रसंगी आगार प्रमुख अमोल बनकर, महावितरणचे उपकार्यकारी अभियंता धनंजय धांडे, सहाय्यक अभियंता अतुल खंदारे, महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता विजय गोसावी, सहाय्यक अभियंता अशोक राख, स्थापत्य शाखेचे कनिष्ठ अभियंता संजय दरेकर, विद्युत विभागाचे कनिष्ठ अभियंता एम.एम. संगमनेरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube