काँग्रेस अन् भाजपपासून सावध राहणार.. जानकरांना वाटतेय वेगळीच भीती

काँग्रेस अन् भाजपपासून सावध राहणार.. जानकरांना वाटतेय वेगळीच भीती

Mahadev Jankar : राज्यात सध्या जोरदार सत्तासंघर्ष सुरू आहे. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना (Shiv Sena) नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर राजकारण आधिक तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप-प्रत्यारोप सुरू असताना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी मात्र सावध भूमिका व्यक्त केली आहे.

जानकर म्हणाले, की ‘मी मंत्री असताना सांगायचो भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) दोन्हीही फसवे पक्ष आहेत. आम्ही बाहुले नाही तर पक्षाचे मालक आहोत. जसा मोठा मासा छोट्या माशाला तसं ते आम्हाला खात आहेत. आम्हाला आता सावध रहावे लागणार आहे. काँगेस बरोबर जे जे पक्ष गेले त्यांची अवस्था बघा, आता काँग्रेसचेच भाजपा झाले आहे.’

हे वाचा : Mahadev Jankar म्हणतात; गोपीचंद पडळकर हा माझाच कार्यकर्ता! 

जानकर यांनी शिवसेनेवरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की ‘एखादं मंडळ काढणं सोपं असतं. पण, पक्ष काढणे खूप अवघड आहे. पक्ष काढणाऱ्याच्या हृदयाला काय वेदना होतात हे त्याचे त्यालाच माहित. बाळंतपणीला जी वेदना होते ते ज्यांचं बाळंतपण होत नाही त्यांनी बोलू नये. त्या वेदनेशी मी सहमत आहे.’

Mahadev Jankar : भाजपकडे मंत्रिपद मागणार नाही; त्यांना वाटलं तर देतील किंवा नाही देणार!

आगामी लोकसभा निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केले. ते म्हणाले, की ‘निवडणुकीच्या दृष्टीने 90 हजार पोलिंग बुथ आम्ही तयार करत आहोत. 40 ते 42 टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व 48 जागा लढविण्याची तयारी आहे. मी स्वतः परभणी, बारामती, म्हाडा आणि मिर्जापूर या चार मतदार संघावर लक्ष केंद्रीत केले आहे. या चार पैकी दोन ठिकाणी विजयी होता येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube