काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांचं मोठ विधान; संभाजी महाराजांच्या हत्या प्रकरणात दिला मनुस्मृतीचा दाखला

Hussain Dalwai or Chhatrapati Sambhaji Maharaj Died : काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी आता वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. नागपूर हिंसाचार प्रकरणी परिस्थितीची पाहणी करायला आले तेव्हा ते बोलत होते. (Dalwai) छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने ज्या पद्धतीने मारले, ती क्रूरता होती. संभाजी महाराजांना मारण्याचा आदेश दिल्यानंतर त्याला कसं मारावं हे मनुस्मृतीप्रमाणे पंडितानी सांगितलं होत असा दावा हुसेन दलवाई यांनी केला आहे. इतिहासाचा हा पैलू फडणवीस मान्य करतील का? असंही ते यावेळी म्हणाले आहेत.
प्रशांत कोरटकर तेलंगणामध्ये एका काँग्रेस नेत्याच्या घरी सापडले, या भाजपच्या या आरोपाबद्दल हुसेन दलवाई यांनी सावध प्रतिक्रिया दिली. तेलंगणामधील कोण नेता आहे, तो काँग्रेसचा नेता होता की RSS चा नेता होता हे मला माहीत नाही. तो काँग्रेसचा नेता असेल, तर कदाचित त्याला माहीत नसेल की प्रशांत कोरटकर कोण आहे? हा कोरटकर त्याला भेटायला गेला असेल, म्हणून ते भेटले असतील, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न हुसेन दलवाई यांनी केला.
छत्रपती संभाजी महाराजांसंदर्भात विकीपीडियावरील वादग्रस्त मजकूर हटवा : मुख्यमंत्र्यांचे आदेश
नागपुरातील हिंसाचारात मुस्लीम धर्माची पवित्र कलमेच्या चादरीवर पायांनी स्पर्श करणे आणि पवित्र कलमेची चादर जाळून अपमान करणे आणि चिथावणीखोर भाषण करुन दोन समाजात तेढ निर्माण करणारे मंत्री नितेश राणे , RSS, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करुन कडक कारवाई करण्यात यावी. तसंच, नितेश राणे यांची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, यासाठी विधानभवनाच्या गेटसमोर आंदोलन करण्याची हाक शेख आसिफ अहमद यांनी दिली आहे.
आपण कबर आणि बाबर उकरून काढतोय, आपण कोणत्या जमान्यात चाललोय. कबरीवर चढवली जाणाऱ्या चादरीवर कुराणाची आयात लिहिलेली असते. मग ही चादर पायदळी तुडवली गेली जाळली गेली, यामुळे काही लोकांच्या भावना भडकल्या. नितिन गडकरी आणि पंतप्रधान अजमेर शरीफ येथे चादर चढवतात ते चालते. या राज्यात कायद्याचा धाक येणं गरजेचे आहे. हा उत्तर प्रदेश नाही. दंगल करणारा दोषी आहे, तसा कामराचा स्टुडिओ तोडणारे पण दोषी आहेत. बुलडोजर सगळीकडे लावा, असे अंबादास दानवे यांनी म्हटले.