‘निवडणूक अवघड म्हणून भाजपाने राम मंदिर समोर आणलं’; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

‘निवडणूक अवघड म्हणून भाजपाने राम मंदिर समोर आणलं’; पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल

Prithviraj Chavan Criticized BJP : अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत (Ram Mandir) तयारी सुरू असून या सोहळ्याला आता फक्त दोनच दिवस राहिले आहेत. देशभरात सध्या हाच विषय चर्चेत असून राजकारणातही पडसाद उमटताना दिसत आहेत. काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला (BJP) यश मिळत नाही म्हणून त्यांनी राम मंदिराचा विषय आणला आहे, अशी टीका चव्हाण यांनी केली. पृथ्वीराज चव्हाण यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त करत भाजपवर घणाघाती टीका केली.

भाजपवर टीका करताना चव्हाण म्हणाले, भाजपाचा आत्मविश्वास आता ढासळला आहे. मागील 2014 आणि 2019 मध्ये त्यांनी जी धोरणे जनतेसमोर मांडली ती फसली आहेत. त्यामुळे आता तपास यंत्रणांच्या कारवाया करून पक्ष फोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. 2024 ची निवडणूक सोपी नाही हे लक्षात आल्यानंतर आता त्यांनी प्रभू श्रीराम मंदिराचा मुद्दा पुढे आणला आहे. पण, भाजपला यश मिळत नाही. ईडी आणि आर्थिक अमिषे दाखवून पक्ष फोडण्यात येत आहेत, अशा शब्दांत चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

मंत्रिपद सोडा अन् मग बोला! पृथ्वीराज चव्हाणांचा रुद्रावतार, भर सभागृहात भुजबळांना सुनावले

प्रकाश आंबेडकरांना यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन 

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वात भारत जोडो न्याय यात्रा निघाली आहे. या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना केले आहे. आंबेडकरांना इंडिया आघाडीत घ्यायचे की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. इंडिया आघाडीत 28 पक्ष आहेत. आंबेडकरांना आघाडीत घ्यायचे असेल तर आधी मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घ्यावी लागेल. आता प्रकाश आंबेडकर कुणाच्या निमंत्रणाची वाट पाहत आहेत माहिती नाही, असे चव्हाण म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube