मराठवाड्यात अनेक पेट्रोल पंपांवर गर्दीच, अफवांच्या चर्चेत लोक भयभीत

दुचाकी, चारचाकी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

News Photo   2026 03 28T163928.894

मराठवाड्यातील प्रमुख शहरांसह ग्रामीण (Petrol) भागांमध्येही इंधन टंचाई होणार असल्याच्या अफवांनी अचानक जोर धरला असून नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. या अफवांमुळे शहरांसह ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवरही वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या असून अनेक ठिकाणी

गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुचाकी, चारचाकी वाहनधारकांनी मोठ्या प्रमाणात पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी गर्दी केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तात्काळ पावले उचलत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी कठोर निर्बंध लागू केले आहेत. कॅन, बाटल्या किंवा ड्रममध्येइंधन देण्यास सक्त मनाई करण्यात आली असून खुल्या स्वरूपातील विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.

युद्धाच्या झळा! HPCL पेट्रोल पंपांवर इंधन पुरवठ्यात 50 टक्के कपात; अनेक पंप कोरडे पडण्याच्या उंबरठ्यावर

काही भागात दुचाकी वाहनांसाठी जास्तीत जास्त २०० रुपये, तर तीनचाकी व चारचाकी वाहनांसाठी २,००० रुपयांपर्यंतच इंधन देण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. वाढती गर्दी लक्षात घेता अनेक पेट्रोलपंपांवर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, पेट्रोल पंप चालकांनी नागरिकांना दिलासा देत स्पष्ट केले आहे की, पेट्रोल व डिझेलचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असून कोणतीही टंचाई नाही.

या परिस्थिमुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये तसंच अनावश्यक साठवणूक टाळावी,असे आवाहन करण्यात आले आहे. प्रशासनाकडूनही नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं असून, चुकीच्या माहितीमुळे निर्माण होणारी गर्दी व गोंधळ टाळण्यासाठी संयम राखून प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं, असं सांगण्यात आलं आहे.

follow us