आहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ; ‘व्हिप्स’कडून कोट्यावधींचा गंडा, सुत्रधारासह साथीदारांचं दुबईला पलायन

आहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ; ‘व्हिप्स’कडून कोट्यावधींचा गंडा, सुत्रधारासह साथीदारांचं दुबईला पलायन

Fraud from Whips : क्रिप्टो करन्सी, शेअर मार्केटच्या वेगवेगळ्या कंपना स्थापन करत हजारो कोटी रुपयांची फसवणूक करुन विनोद खुटे दुबईत जाऊन लपून बसला आहे. महाराष्ट्राबरोबरच गुजरात कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, ओडिशातील लोकांचीही मोठी फसवणूक झाली आहे. ईडीच्या प्राथमिक तपासानुसार हा आकडा एक हजार कोटीपेक्षा (Fraud) जास्त असल्याचं सांगितलं जातं जिल्ह्यातील कर्जत, जामखेडसह नगरमधील अनेकांना त्याने कोट्यवधी रुपयांना चुना लावला आहे.

खुटे याच्या व्हीआयपीएस ग्रुपविरुद्ध शंभर कोटींच्या पॉन्झी घोटाळ्याबाबत भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात ऑक्टोबर 2023 मध्ये गुन्हा दाखल झाला. दुसऱ्या दिवशी खुटे नेपाळमार्गे दुबईला पळून गेला. त्याच्या वोरिधात गुन्हेगारी कट आणि फसवणुकीच्या आधारे प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अॅक्ट आणि फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट अॅक्ट अंतर्गत ईडीकडून तपास सुरू आहे. पुणे आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.

काश्मीरमधील 48 पर्यटन स्थळे बंद, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर मोठा निर्णय

त्याचाच एक भाग म्हणून पोलिसांनी मार्च 2024 मध्ये खुटे याच्या दुबईतील 37.50 कोटींच्या मालमत्ता जप्त केल्या आहेत. एप्रिल 2024 मध्ये 24.41 कोटींच्या जंगम मालमत्ता 8.98 कोटींच्या स्थावर मालमत्ता, पुण्यातील फ्लॅट, हॉल, कार्यालये आणि आहिल्यानगर जिल्ह्यातील जमिनी अशा सुमारे 70 कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन वर्षानंतर पीडित बोलू लागले आहेत. 20 ते 30 पीडितांनी पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाब दिले आहेत.

खुटे याचे महाराष्ट्रात काही लोक एजंट म्हणून आजही काम करीत आहेत. आहिल्यानगर जिल्ह्यातील संतोष खुटे, मंगेश खुटे, (सर्वं रा. निमगाव डाकू ता. कर्जत) किरण अनारसे (आंबीजळगाव, ता. कर्जत) हे खुटे याचे भागीदार आहेत. ते सर्व दुबईला पळून गेले आहेत. तसंच, अकलूज येथील इम्रान चौधरी आणि नासिर चौधरी हे बुल्स कॅपिटल नावाने वेगळी स्किम राबवून खुंटलेला पाठबळ देत आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या