Pavana Dam : पवना धरणात पाणीसाठ्यात मोठी वाढ; धरण 65.71% भरले

Pavana Dam : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून आज सकाळी धरणातील उपयुक्त

Pavana Dam

Pavana Dam : पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणाच्या पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत असून आज सकाळी धरणातील उपयुक्त पाणीसाठा 65.71% इतका नोंदविण्यात आला आहे. धरण परिसरात गेल्या 24 तासांत 197 मिमी पावसाची नोंद झाली असून, 1 जूनपासून आतापर्यंत एकूण 1405 मिमी पाऊस झाला आहे.

धरणाची सद्यस्थिती ( 8 जुलै 2026, सकाळी 6:00):

जलपातळी : 609.39 मीटर

एकूण पाणीसाठा : 189.52 Mm³ (6.69 TMC)

उपयुक्त पाणीसाठा : 158.38 Mm³ (5.59 TMC)

धरण भरले : 65.71%

मागील वर्षी याच दिवशी : 77.54% (6.60 TMC)

24 तासांचा पाऊस : 197 मिमी

1 जूनपासून एकूण पाऊस : 1405 मिमी

सांडव्यातून विसर्ग : 0.00 क्युसेक

ICPO विसर्ग : 0.00 क्युसेक

इतर विसर्ग : 0.00 क्युसेक

1 जूनपासून एकूण आवक : 98.91 Mm³ (3.49 TMC)

सध्या धरणातून कोणताही पाण्याचा विसर्ग सुरू नसल्याने नदीकाठच्या नागरिकांनी प्रशासनाच्या पुढील सूचनांकडे लक्ष ठेवावे.

राज्यात आजही अतिमुसळधार पाऊस, ‘या’ जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी-

follow us