जाता जाताही देणार अन्… ; ‘त्या’ फाईलचा उल्लेख करत फडणवीसांनी सांगून टाकला निकाल…
Devendra Fadnavis : पोलीस पाटलांचे (Police Patil) वय साठवरून पासष्ट करण्याच्या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे. पोलीस पाटलांच्या खात्यात दर महिन्याला पंधरा हजार रुपये मानधन मिळेल, त्यांना रिटायरमेंटनंतरही काहीतरी मिळालं पाहिजे यासाठीही सरकार प्रयत्नशील आहे. आम्ही जाता जाताही देणार आहोत, अन् येता येताही देणार आहोत, असं सांगत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) पोलीस पाटलांच्या प्रलंबित मागण्याबाबत सकारात्मकता दर्शवली.
RajKummar Rao: राजकुमारच्या वाढदिवशी चाहत्यांना आणखी एक खास भेट, ‘आगामी’ सिनेमाचा नवा लूक प्रदर्शित!
फुल पगारी, फुल अधिकारी
कामगार पोलीस पाटील संघाचे 8 वे अधिवेशन नागपूरमध्ये संपन्न झाले. यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले, मी गृहमंत्री आहे. पण, पोलीस पाटील हे देखील आपल्या गावचे गृहमंत्रीच आहेत. कारण, कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आपला मोलाचा वाटा आहे. पोलीस पाटील पद मानाचं होतं, पण सन्मानाचं नव्हतं. मानाच्या पदाला सन्मान मिळणं गरजेचं होतं. पोलीस पाटील संघटनेचे लोक मला सांगायचे की, आम्हाला बिन पगारी, फुल अधिकारी म्हणून हिनवल्या जातं. त्यामुळं तुम्हाला फुल पगारी, फुल अधिकारी असाच दर्जा आम्ही देणार आहोत, असं फडणवीस म्हणाले.
अनेकांना पाठपुरावा केल्यानंतर तीन हजार रुपयांवरून साडेसहा हजार मानधन केलं. पण, 21 शतकात सहा-साडेसहा हजार फार कमी मानधन होतं. त्यामुळं छातीला लावा माती लावून पंधरा हजार रुपये मानधन केलं. आता अपर मुख्य सचिवांना त्याबाबतच जीआर काढण्याचे आदेश दिले. लवकरच पैसे जमा होतील. दर महिन्याला पैसे खात्यात येतील, असं फडणवीस म्हणाले.
सरकारी फाईलींना गोगलगायीचे पाय…
पुढं ते म्हणाले, काम चाललं फाईलींनी, पण फाईलला गोगलगायीचे पाय असतात. कधी तरी त्या फाईलला धक्का द्यावा लागलो, तसा आम्ही धक्का दिल्या. आता चिंता करायची गरज नाही, असं फडणवीस म्हणाले.
फडणवीस म्हणाले, अंगणवाडी सेवकांचं वय साठवरून पासष्ट केलं. पोलिस पाटलांच वय साठवरून पासष्ट करावं, या मागणीबाबत सरकार सकारात्मक आहे. मंत्रिमंडळाशी चर्चा करून यावर निर्णय घेणार आहोत. शिवाय, जेव्हा पोलीस पाटील रिटायर होतात, तेव्हा त्यांना काहीच मिळत नाही. त्यांना रिटायरमेंटनंतर काहीतरी मिळालं पाहीजे, यासाठी सरकार निर्णय घेईल, असं फडणवीस म्हणाले.
पोलीस पाटलांचा सन्मान पोलीस अधिकारी आणि महसुली अधिकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी जीआर काढून पोलीस विभागाला आणि महसूल विभागाला पाठवू. त्यांना अपमानीत व्हावं लागणार नाही. मुंबईला गेल्यानंतर या मुद्यावर तात्काळ निर्णय घेण्याकरिता एक कमिटी तयार करून या सगळ्या मद्द्यांचा निकाल आम्ही लावू. आम्ही जाता जाताही देणार आहोत, अन् येता येताही देणार आहोत. माझी भविष्यातही तुमच्यासोबतच राहणार आहोत. फक्त पोलीस पाटलांनी कर्तव्याशी एकनिष्ठ असावं, असं फडणवीस म्हणाले.