पंढरपूर दौऱ्यावरुन देवेंद्र फडणवीसांची के. चंद्रशेखर राव यांना तंबी, म्हणाले…
यंदाच्या आषाढी वारीच्या महासोहळ्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात दाखल होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी के चंद्रशेखर राव यांना तंबी दिली आहे. के. चंद्रशेखर राव पंढरपुरात भक्तीभावाने येत असतील तर स्वागत, फक्त राजकारणासाठी कोणी येऊ नये, या शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी के चंद्रशेखर राव यांनी तंबीच दिली आहे. सातारा दौऱ्यादरम्यान फडणवीसांनी माध्यमांशी संवाद साधला.
भारत-अमेरिकेचं संविधान लोकशाहीवर आधारित, व्हाईट हाऊसमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं संबोधित
मागील काही दिवसांपासून तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी विदर्भानंतर मराठवाड्यात लक्ष घातल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यानंतर आता के. चंद्रशेखर राव यांनी आपला मोर्चा पश्चिम महाराष्ट्राकडे वळवला आहे. काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच चर्चा रंगली होती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केसीआर महाराष्ट्र दौरा करीत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.
Thackeray Group Office : ठाकरे गटाला आणखी एक दणका; वांद्रे पूर्वमधील कार्यालयावर बीएमसीची कारवाई
आषाढी वारीच्या महासोहळ्यात सहभागी होण्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात येणार आहेत. चंद्रशेखर राव यांच्यासोबत तेंलगणा सरकारचे संपूर्ण मंत्रिमंडळ देखील हजेरी लावणार आहे. यासोबतच हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर ते पुष्पवृष्टी करणार आहेत. पंढरपूर दौऱ्यासाठी तब्बल 300 गाड्यांच्या ताफ्यातून हे मंत्रिमंडळ महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
दरम्यान, दरवर्षी आषाढी वारीसाठी राज्याचे मुख्यमंत्रीदेखील विठुरायाकडे साकडं घालण्यासाठी आषाढी एकादशीला येत असतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही आषाढी वारीला पंढरपुरात येणार आहेत. आता दोन राज्यांचे मुख्यमंत्री पंढरपुरात दाखल होणार असल्याने आगामी 2024 च्या निवडणुकीत विठुराया नेमका कोणाला पावणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
केसीआर यांच्या पंढरपूर दौऱ्यावरुन नूकतीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी रोखठोक भाष्य करीत त्यांनी तंबी दिल्याचं दिसून येत आहे. फडणवीस पुढे बोलताना म्हणाले, कुणालाही पंढरपुरात येता येईल , पंढरपुरात सर्वांच स्वागत आहे. पण फक्त राजकारणासाठी कोणी येऊ नये, भक्तीभावाने कोणी येत असेल तर त्यांच स्वागतच असल्याचं ते म्हणाले आहेत. देवेंद्र फडणवीसांच्या तंबीनंतर अद्याप के. चंद्रशेखर राव यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसून फडणीसांच्या या विधानावर चंद्रशेखर राव काय बोलणार? हेही पाहणं तितकचं महत्वाचं ठरणार आहे.