राऊतांबद्दल विचारताच फडणवीसांनी सांगितला स्वतःचा स्तर; काँग्रेसच्या जाहीरनाम्याचीही चिरफाड

  • Written By: Published:
राऊतांबद्दल विचारताच फडणवीसांनी सांगितला स्वतःचा स्तर; काँग्रेसच्या जाहीरनाम्याचीही चिरफाड

नागपूर : ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेंच्या फाऊंडेशनविरोधात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे तक्रार केली आहे. याबाबत देवेंद्र फडणवीसांना प्रश्न विचारला असता, त्यांनी थेट कोण संजय राऊत (Sanjay Raut) असा प्रतिप्रश्न पत्रकारांना केला. तसेच तुम्ही जरा गुणवत्ता असलेल्या लोकांबद्दल प्रश्न विचारा असा टोला लगावला. एवढेच काय तर, माझा स्तर बघून तरी प्रश्न विचारत चला अशा सूचना केल्या. फडणवीसांच्या या टीकेला आता राऊत काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यावेळी फडणवीसांनी काल (दि. 14) भाजपकडून जाहीर करण्यात आलेला जाहीरनाम्यात काय काय याबाबत फोड करून सांगितले. (Devendta Fadnvis Attack On Sanjay Raut)

सूज्ञ जनतेची विकासाला साथ, पोपटपंची करणाऱ्यांना नाही; खा. विखेंचा लंकेंना टोला

भाजपचा जाहीरनामा सर्व घटकांना समर्पित असून, मोदींच्या गॅरंटीच संकल्पपत्र हे देशाच्या विकासासाठी असल्याचे फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याची अक्षरक्षः चिरफाड करत त्यांच्यासाठी जाहीरनामा फक्त एक कागद आहे. काँग्रेस कधीच त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण करत नाही असा थेट आरोप फडणवीसांनी यावेळी केला.

फडणवीसांनी सोप्या शब्दांत समजावून सांगितला जाहीरनामा

यावेळी फडणवीसांनी भाजपकडून जाहीर करण्यात आलेला संकल्पपत्रात काय काय याचे सोप्या शब्दांत फोड करून सांगितली. ते म्हणाले की, पुढची पाच वर्ष 80 कोटी नागरिकांना रेशन मोफत देण्याचा संकल्प करण्यात आहे. याशिवाया 70 वर्षावरील नागरीकांना युनिव्हर्सल मोफत उपचार देण्यात येणार आहेत.सिलेंडरऐवजी पाईप गॅसने पुरवठा करण्याचा निर्धार आहे. याशिवाय गावोगावी धान्य साठवण्यासाठी गोदामे तयार करण्यात येणार असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले.

VBA Manifesto : लोकसभेसाठी आंबेडकरांच्या वंचितचा खास जाहीरनामा प्रसिद्ध; मतपरिवर्तन होणार?

काय काय केलं जाणार?

भाजपच्या संकल्पपत्राबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, एमएसीपीमध्ये भरघोस वाढ करण्यात आली असून, भविष्यात फळं आणि भाज्या टिकवण्यासाठी अधिक उपाययोजना करण्यात येणार आहे. याशिवाय देशात पहिल्यांदाच कृषी सॅटेलाईट प्रक्षेपित केले जाणार आहे. नैसर्गिक शेतीचा विस्तार करण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आले असून, पीकवीमा योजना अधिक मजबूत करून ही योजना श्रीअन्नाला सुपरफुड म्हणून प्रमोट केली जाणार असल्याचे यावेळी फडणवीसांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज