अनेक विक्रम नोंदवत फडणवीस पवारांच्या रांगेत; ‘मी पुन्हा येईल’ ची Inside Story
मुंबई : विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र पर्व सुरु होणार आहे. 2019 मध्ये देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) राज्यातील जनतेला ‘मी पुन्हा येईल’ असा शब्द 2019 मध्ये दिला होता. त्यावेळी त्यांच्या या विधानाची अनेकांनी खिल्ली उडवली होती. मात्र, आता तेच फडणवीस ”मैं समंदर हूँ, लौटकर फिर आऊँगा” असे म्हणत तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान होणार आहेत. राज्याच्या इतिहासात उपमुख्यमंत्री राहिलेली व्यक्ती महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्री होत नाही ही परंपराही फडणवीसांनी मोडीत काढली आहे. फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईल’ मागे नेमकी कोण कोणती कारणं आहेत याचाच घेतलेला हा आढावा…
Video : फडणवीसांच्या सूचक विधानानं मोठा गेम होण्याची शक्यता; रोख नेमका कुणाकडे?
कोणते गुण फडणीसांना परत घेऊन आले
2019 साली त्यांनी नारा दिला, ‘मी पुन्हा येईन’ त्यावेळी त्यांची खिल्ली उडवली. पण प्रचंड मेहनत, आत्मविश्वास आणि सगळ्यांना जिंकून फडणवीस परत येत आहेत. फडणवीस हे प्रचंड अभ्यासू नेते आहेत. अभ्यासू स्वभाव, विषय समजून घेण्याची हातोटी मुद्देसूद मांडणी हे गुण अनेकांना प्रभावित करतात.
आक्रमक विरोधी पक्ष नेता
अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार पडेल असं फडणवीस सातत्याने म्हणायचे. विरोधी पक्षनेते म्हणून देवेंद्र फडणीसांनी जे काम केलं
त्याला तोड नव्हती. कोरोना काळात त्यांनी अनेक दौरे केले, अनेक ठिकाणी भेटी दिल्या. जनतेमध्ये थेट जायला प्राधान्य दिलं. त्याची चर्चा जरी जास्त झाली नसली तरी देवेंद्र फडणवीसांनी आपलं काम सोडलं नाही.
देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी समारंभाची निमंत्रण पत्रिका व्हायरल; तुम्ही पाहिलीत का?
ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता
फडणवीस यांचा आणखी एक गुण म्हणजे ट्रोलिंग सहन करण्याची क्षमता. त्यांच्यावर फक्त विरोधकच टीका करतात असं नाही, तर सोशल मीडियावरही त्यांच्यावर टीका केली जाते. मात्र, अन्य नेत्यांसारखी फडणवीसांनी कधीही आरडाओरड, आदळआपट केली नाही. ज्या टीकेला उत्तर देणं गरजेच आहे, त्याच टीकेलाच फडणवीसांनी योग्यवेळी उत्तर दिलं.
विकासाचं व्हिजन
इन्फ्रास्ट्रक्चर मॅन ही सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे. त्यांनी त्यांच्या साडेसात वर्षाच्या सत्ता काळात पायाभूत सोयी-सुविधाचे अनेक प्रकल्प मार्गी लावले. महत्त्वाच म्हणजे सुरु केलेले प्रकल्प त्यांच्या कार्यकाळातच पूर्ण झाले. उदहारणार्थ मेट्रो, कोस्टल रोड, अटल रोड. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा एक वेगळा चाहता वर्ग तयार झाला.
उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना देवेंद्र फडणवीसांनी भाजपची कशी वाढ होईल याचा विचार केला. त्याचाच फायदा भाजपला निवडणुकीत झाल्याचं दिसून येतंय. भाजपने त्यांच्या इतिहासाताली सर्वाधिक जागा तर जिंकल्याच, पण महायुतीतील इतर पक्षांचे आमदारही निवडून आणले.
अमित शहांचा आदेश, शिंदेंना धक्का, ‘या’ 3 मंत्र्यांना मिळणार डच्चू?
विक्रम नोंदवत फडणवीस पवारांच्या रांगेत
राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीसांच्या नावे अनेक विक्रमही नोंदवले गेले आहेत. यात शरद पवारांनंतर (Sharad Pawar) तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान होण्याचा मान त्यांच्या नावे असणार आहे. याशिवाय फडवीसांच्या नेतृत्त्वाखाली 2014, 2019 आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप 100 पेक्षा जास्त आमदार विजयी करू शकली आहे. यात सर्वात अधोरेखित करणारी बाब म्हणजे उपमुख्यमंत्री राहिलेला व्यक्ती महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री होत नाही. परंतु, ही परंपरा फडणवीसांनी मोडित काढली आहे.