हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे अंदाज खरे ठरलेत का?

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे अंदाज खरे ठरलेत का?

अरबी समुद्रातील चक्रीवादळ पुढे सरकताच राज्यात पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी वर्तवला आहे. एकंदरीत ही हवामान प्रणाली सक्रिय असताना सुद्धा राज्यातील काही भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Shah Rukh Khan : चाहत्यांच्या सवालांना किंग खानचे मजेशीर उत्तर; म्हणाला, ‘भावा जेवलास का?’

बिपरजॉय चक्रीवादळ गुजरात किनाऱ्याजवळ जातात त्याच्या प्रभावाने राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण होणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, हवामानाचे अभ्यासक पंजाबराव डख यांचे अंदाज आत्तापर्यंत खरे ठरलेत का? कारण डख यांनी राज्यात मान्सून 1 ते 3 जूनदरम्यान दाखल होणार असल्याची शक्यता वर्तवली होती. मात्र, शक्यतेनूसार मान्सून बरसला नसल्याचं दिसून आलं. आत्ताही पंजाबराव डख यांनी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून हलक्या स्वरुपाचा पडणार असल्याचा अंदाज वर्तवला.

Horoscope Today 13 June 2023: आज ‘कन्या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

अरबी समुद्रात घोंगावत असलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून हलक्या स्वरुपाचा असणार आहे, असा अंदाज डख यांनी वर्तवला आहे. येत्या 13 जून ते 15 जूनपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातील कोकणपट्टीतील सातारा, कोल्हापुर, सांगली, पुणे, नाशिक भागांत मान्सून सक्रिय राहणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Red Rice: लाल तांदळाला आहारात समाविष्ट करण्याचे 7 आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

आता राज्यात मान्सून जरी दाखल असला तरी पश्चिम महाराष्ट्र वगळता इतर भागांत पुढे जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं आहे. अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे बाष्प उडून जाणार आहे. हे चक्रीवादळ बाष्प ओढून घेऊन जाणार असल्याने महाराष्ट्रातील इतर भागांत मान्सून बरसणार नसल्याची शक्यता त्यांनी वर्तवलीय.

दरम्यान, महाराष्ट्रात जर पूर्वेकडून मान्सून आला तर अधिक प्रमाणात पाऊस बरसणार असल्याचीही शक्यता असल्याचं ते म्हणाले आहेत. सध्या मान्सून अहमदनगरच्या पुढील भागात म्हणजेच कोकणकिनारपट्टीत दाखल झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

पंजाबराव डख यांची शक्यता आत्तापर्यंत काही अंशी खरी ठरली असल्याचं बोललं जातंय. तर काही भागांत डख यांची शक्यता निष्फळ ठरल्याचं मानलं जातं आहे. त्यामुळे आता चक्रीवादळाच्या अनुषंगाने पंजाबराव डख यांनी वर्तवलेली शक्यता कितपत खरी ठरेल? हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube