Video : पंकजा मुंडेंचं नाव घेवून अपहरण, मग बेदम मारहाण; बीडमधील भयंकर घटना
Dnyaneshwar Ingle Kidnapping In Beed : सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनं बीड जिल्हाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला (Beed Crime) आहे. या हत्या प्रकरणाचा मुद्दा उचलून धरत विरोधकांकडून देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्यावर निशाणा साधला जातोय. बीड जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत असतानाच आता बीडमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. त्यामुळं आता गणपत इंगळे नावाच्या व्यक्तीचं देखील अपहरण (Dnyaneshwar Ingle Kidnapping) झाल्याचं समोर आलंय. मला मारहाण केली, असं देखील इंगळे म्हणालेत.
मनोज जरांगेंचा सरकारला इशारा; फरार आरोपींना अटक न झाल्यास मराठे रस्त्यावर उतरणार
अपहरणानंतर गणपत इंगळे यांनी स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर त्यांची प्रतिक्रिया समोर आलीय. ते म्हणाले की, मला सकाळी पाच वाजता आपल्याला मुंबईला जायचं आहे. आपल्याला पंकजाताईंकडून वीस लाखाचं पत्र आणायचं आहे, म्हणून 2 लाख रूपये दहा टक्क्याने सोबत घेवून गेलो. कळम चौकातून गाडी पोलीस स्टेशनच्या गेटमधून आली. गाडी येईना म्हणून गाडीची वाट पाहात बसलो (Beed Crime News) होतो. त्यानंतर त्यांनी मला त्या गाडीत बसवलं. मुंबईला जायचं म्हणून निघालो. निघाल्यानंतर वाटेतच त्यांनी माझा दोरीने गळा आवळला. पण त्यांनी पॅक आवळला नाही, मी दोन्ही हातांनी प्रतिकार केला. त्यामुळं मला काही झालं नाही. पाटोद्याच्या पुढे एक पेट्रोलपंप बंद पडलेला आहे. त्याच्या पुढे उजव्या बाजूला एक बंगला आहे. त्या बंगल्यात नेवून मारहाण केली.
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड तर काहीच नाही, यांची क्राईम हिस्ट्री बघा!
मला त्या बंगल्यात कोंडून ठेवलं. दोरीने बांधून पायाला साखळी लावून कुलूप लावलं. संध्याकाळपर्यंत बघू तुझं काय करायचं आहे ते? असं म्हणत त्यांनी माझ्या खिशातील पैसे काढून घेतले. मोबाईलवर माझे 51 हजार रूपये फोन-पेवर (Crime News) आहेत. या व्यक्तीचं नाव ज्ञानेश्वर गणपत इंगळे आहे. हे राहायला केजला आहेत. ज्या लोकांनी उचललं त्यांची ओळख आहे. त्या व्यक्तीचं नाव दत्ता तांदळे असल्याचं गणपत इंगळेंनी सांगितलं आहे.
माझे पैसे घेवून मला मारून टाकायचं होतं, या उद्देशाने मला उचललं होतं. संध्याकाळपर्यंत अजून पैसे मागव, तुला सोडून देतो असं देखील ते लोकं म्हणाले होते. मुळात ती गाडीच केज पोलीस ठाण्यातून निघाली होती. मी स्वत: पाहिलंय. त्यामुळे पोलीस स्टेशनला तक्रार करून उपयोग काय? त्यामुळं मी बीडला एसपी ऑफिसला तक्रार करणार आहे. गाडीच पोलीस स्टेशनमधून आली होती. त्यामुळं पोलीस मॅनेज आहे का नाही? यात आपण काय समजायचं. डिपार्टमेंट मॅनेज असल्याशिवाय या गोष्टी होत नाहीत, असं देखील गणपत इंगळे म्हणाले आहेत.