मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत, SITने डॉक्टरला उचललं…

मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत, SITने डॉक्टरला उचललं…

Santosh Deshmukh Murder Case: बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील फरार तीनही आरोपींना मदत करणाऱ्या संशयित आरोपींना एसआयटीने (SIT) ताब्यात घेतलं आहे. धारूरच्या कासारीतून एका डॉक्टरसह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे.

शरद मोहोळच्या हत्येचा बदला घेण्याचा कट उधळला, दोन तरुणांना पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या… 

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य फरार आरोपींना पकडण्यासाठी सीआयडी पोलिसांनी वेगाने चक्रे फिरवली. आज एसआयटीच्या पथकाने बीडमधून तीन जणांना ताब्यात घेतलं. त्यात एक डॉक्टरांचाही समावेश आहे. डॉ. संभाजी वायबसे असं ताब्यात घेतलेल्या डॉक्टरांचे नाव आहे. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने वायबसे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतलं. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तिघांनी सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळेला पळून जाण्यास मदत केल्याचा संशय आहे.

अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला खिंडार! मनपा निवडणुकीच्या तोंडावर तीन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश… 

दरम्यान, ताब्यात घेतलेल्या तीन संशयित आरोपींची दीड तासपासून कसून चौकशी करण्यात येत आहे. त्यांच्याकडून फरार आरोपींची माहिती घेतली जात असून या चौकशीत अनेक खुलासे होण्याची शक्यता सूत्रांनी दिली आहे.

बीड हत्या प्रकरणात वाढत्या राजकीय आणि सामाजिक दबावानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या तपासावर विशेष लक्ष देऊन फरारी आरोपींना अटक करण्याचे निर्देश पोलिसांना दिलेत. याशिवाय हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी हा खटला लढावा, यासाठी त्यांच्यासोबत फोनवरही संपर्क साधला आहे. दुसरीकडे या घटनेचा सूत्रधार असल्याचा आरोप होत असलेल्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक केली आहे.

पुण्यातील सीआयडी कार्यालयात वाल्मिकने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता केज सत्र न्यायालयाने वाल्मिक कराड याला १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. वाल्मिक कराड सध्या बीड कारागृहात असून त्याच्याकडून अनेक घटनांची सखोल चौकशी करण्यात येतेय. सीआयडीचे तपास अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीकडून हा तपास सुरू आहे.

सुरेश धस काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर बोलताना धस म्हणाले, त्यांच्याच पक्षातील लोक म्हणत आहेत. मी अद्याप राजीनामा मागितलेला नाही. मात्र प्रकाश सोळंके हे जिल्ह्यातील ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की यांचा राजीनामा घ्या… कुणाला संधी देऊ नका. एखादं मंत्रीपद रिक्त राहू द्या. एक जागा रिक्त राहिली तर काही फरक फडतो का? असा सवाल त्यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube