दुष्काळाचा दाह : टँकरच्या पाण्यावर भागतेय तहान, धरणेही खपाटीला ! जायकवाडीत किती पाणीसाठा ?
राज्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील जनतेची तहान टँकरच्या पाण्यावर भागवली जात आहे. जनावरांनाही टँकरने (Tanker) पाणी पुरविले जात आहे. धरणेही आटली आहेत. मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना शहराला व इतर भागाला, एमआयडीसींना पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडी (Jayakwadi) धरणात केवळ साडेपाच टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणातील पाणीपातळी गेल्या दोन महिन्यात तब्बल 18 टक्कांनी घटली आहे. त्यामुळे पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आजच्या घडीला 25 जिल्ह्यांतील सुमारे तीन हजार गावांना साडेतीन हजारहून अधिक टँकरने पाणीपुरवठा होत आहे.
(Drought in the state; Thirst is running on the water of the tanker, the dam is also in trouble! How much water storage in Jayakwadi?)
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यानंतर नाशिक विभागातील अहमदनगर (Ahmednagar), नाशिक, धुळे, नंदुरबार भागात तीव्र पाणीटंचाई आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातही तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये साडेसातशेहून अधिक टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जनावरांसाठी चारा-पाण्याची बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. पशुधन वाचविण्याचे मोठे आवाहन शेतकऱ्यांसमोर आहे. सध्या मिळेल तेथून महागडा चारा शेतकरी विकत घेत आहे. परंतु भविष्याच हिरवा चाराही मिळणे अवघड होणार आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरू करण्याच्या मागण्या शेतकऱ्यांकडून लोकप्रतिनिधी, प्रशासनाकडे होत आहे. परंतु राज्यातील लोकसभा निवडणूक पार पडली आहे. परंतु आचारसंहिता उठविण्यात आलेली नाहीत. त्यामुळे दुष्काळी उपाययोजना करण्यात सरकारला अडचणी येत आहेत.दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करण्याची मागणी सरकारकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. यंदा राज्यात मान्सूनचा पाऊस चांगला होईल, असा अंदाज हवामान विभागाचा आहे. यंदा वेळेवर मान्सूनचा पाऊस होईल. यंदा राज्यात 106 टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाचा आहे. त्यामुळे हा एक दिलासा असणार आहे.
लोकसभा निवडणुकांसह पवार अन् ठाकरेंविषयी ज्योतिषी अनिल थत्ते यांचं मोठं भाकीत
25 जिल्ह्यांत 3 हजार 692 टँकरने पाणीपुरवठा
2 हजार 973 गावे आणि 7 हजार 671 वाड्यांना टँकरने पाणी
मराठवाड्यात 1 हजार 256 गावे व वाड्यावस्त्यांना 1 हजार 849 टँकरने पाणी
नाशिक विभागातही 756 गावे व अडीच हजार वाड्यावस्त्यांना 812 टँकरने पाणीपुरवठा
पुणे विभागातील 631 गावे आणि पावणेचार हजार वाड्यावस्त्यांना 755 टँकर
धरणांमध्ये २३ टक्के उपयुक्त पाणीसाठा
राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून 23 टक्केच उपयुक्त पाणीसाठा
गेल्या वर्षी हा पाणीसाठा 39 टक्के होता
पुण्यात चाललय काय? विद्यापिठात सापडला गांजा, प्रशासनात भाजपचे लोक; धंगेकरांचा आरोप
जायकवाडी धरणात साडेपाच टक्केच पाणीसाठा
गेल्या वर्षी मे महिन्यात जायकवाडीत 40 टक्के पाणीसाठा
यंदा 25 मार्चमध्ये 23 टक्के पाणीसाठा
सध्या जायकवाडीत केवळ साडेपाच टक्केच पाणीसाठा
जायकवाडीत तब्बल 25 टीएमसीचा मृतसाठा
धरणांतील उपयुक्त पाणीसाठा
विभाग पाणीसाठा
नागपूर 38. 83 टक्के
अमरावती 39.94 टक्के
छत्रपती संभाजीनगर 9.55 टक्के
नाशिक 16.37 टक्के
पुणे 17.56 टक्के
कोकण 37.11 टक्के