सातारा झेडपीतील खडाजंगीवर रात्री उशीरा बैठक, फडणवीसांकडून शिंदेजवळ नाराजी व्यक्त; वाद शमणार की…
Satara ZP CLashesh वर सोमवारी दुपारी सभागृहात खडाजंगी झाल्यानंतर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली.
Eknath Shinde and Devendra Fadanvis Meeting on Satara ZP CLashesh : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या निवडणुकीत भाजपने अनपेक्षित असा विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ उडाला. मतदानाच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे प्रत्येकी दोन सदस्य फुटल्याने राजकीय समीकरणे बदलली. त्यातच मतदानासाठी येत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना अपहरणाच्या गुन्ह्यात पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे त्यांना मतदान करता आले नाही. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना नेते तसेच मंत्र्यांची पोलिसांशी जोरदार झटापट झाली.
‘या’ राशींच्या लोकांना आज होणार आर्थिक फायदा; जाणून दिवस कसा राहणार?
या झटापटीदरम्यान सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हाताला दुखापत झाली. या घटनेचे पडसाद थेट राज्याच्या विधान सभेत उमटले. यावर स्वत: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळालं. त्याचवेळी सभागृहात मुख्यमंत्री फडणवीसांची एन्ट्री झाली. तेव्हा फडणवीसांनी शिंदेना एका वाक्यात उत्तर देत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री उशीरा शिंदे-फडणवीसांची वर्षा बंगल्यावर बैठक झाली. यावेळी भाजपची नाराजी दिसून आली.
भविष्याच्या वाटचालीसाठी साहेबांना दिली तशीच साथ मला द्या: अक्षय कर्डिले
सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी
सातारा जिल्हा परिषदेमुळे महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. यावर सोमवारी दुपारी सभागृहात खडाजंगी झाल्यानंतर रात्री उशिरा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीतील प्रकारावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाराज झाले आहेत. अशी माहिती आहे. या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून करण्यात आलेल्या राजकीय खेळी आणि शंभूराज देसाई यांनी केलेल्या आरोपांमुळे मुख्यमंत्री नाराज झाले आहेत. असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याची माहिती आहे. तसेच सांगली जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये प्रकरणावरून देखील मुख्यमंत्र्यांनी असहमती व्यक्त केली. त्यामुळे आता भाजपा शिवसेनेतील हा वाद शमणार की वेगळं वळण घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
युक्रेनने रशियाचे ऑईल पोर्ट उडवले; भारताला मोठा धक्का, तेल पुरवठा कसा होणार?
दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी सभागृहात उपस्थित असलेल्या मंत्री उदय सामंत आणि गणेश नाईक यांना शासनाच्या वतीने भूमिका मांडण्यास सांगितले. तसेच त्यांनी स्पष्ट निर्देश देताना म्हटले की, ज्या पोलिसांनी लोकांना आणि मंत्र्यांना धक्काबुक्की केली, तसेच मतदारांना मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवले, त्या संबंधित पोलिसांवर शासनाने कारवाई करून त्यांचे निलंबन करावे. यामुळे सातारा जिल्हा परिषद निवडणुकीतील पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत.