फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर, न्याय नक्कीच मिळणार… तांबेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Satyajeet Tambe praises Chief Minister मुख्यमंत्री दौरा करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळणार आशी पोस्ट सत्यजीत तांबे यांनी केली.

Satyajeet Tambe Praises Chief Minister

Fadnavis visits farmers’ fields justice is assured Satyajeet Tambe praises Chief Minister : अहिल्यानगर पावसाने पाठ फिरवल्याने राज्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. या परिस्थितीकडे मी स्वतः देखील मुख्यमंत्री महोदयांचे लक्ष 2 सप्टेंबर रोजी वेधले होते. परिस्थितीचे गांभीर्य पाहून आज मुख्यमंत्री स्वतः दुष्काळ दौरा करत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना नक्की न्याय मिळणार आशा आशयची पोस्ट आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.

सरकारी दरात वाढ कायम असताना उत्तर प्रदेशातील काही भागांत एजन्सींकडून कमी किमतीत विक्री

ज्या विश्वासाने हा शेतकरी आपल्या व्यथा आणि अपेक्षा देवेंद्रजींकडे मांडतो आहे आणि ज्या संवेदनशीलतेने त्याला मुख्यमंत्री महोदय प्रतिसाद देत आहेत, धीर देत आहेत, हे चित्र खरंच आशादायी आहे.

डिंभे माणिक डोह स्थगिती होऊच देणार नाही, अन्यथा… विखेंकडे बोट दाखवत रोहित पवारांचा इशारा

खरंतर मुख्यमंत्री जेव्हा खुद्द शेतकऱ्याच्या बांधावर जातात, तेव्हा थेट सरकारचं शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोहचलं आहे हा विश्वास निर्माण होतो. यातून खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही, याची मला खात्री आहे अशा शब्दात आमदार सत्यजित तांबे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले.

मुख्यमंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

राज्यात भयंकर दुष्काळाची स्थिती आहे. गेल्या दीड महिन्यापासून पाऊसच कोसळला नसल्याने पिकं करपून गेली आहेत. त्यामुळे पाण्यासह जनावराच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरात लवकर आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करत आहेत. तसेच दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही केली जात आहे. या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचे सर्वच मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करत आहेत.

‘हनुमान अंश’चा जागतिक दबदबा कायम; 12 दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियन+ची विक्रमी कमाई

आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच फिल्डवर उतरले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस आज लातूरमध्ये जाऊन शेती नुकसानीची पाहणी करत आहेत. तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यावेळी दुष्काळ निवारणासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

follow us