Sangita Thombare : भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक, रुग्णालयात दाखल
Sangita Thombare : भाजपच्या (BJP) नेत्या आणि केज विधानसभेचे माजी आमदार संगीता ठोंबरे (Sangita Thombare) यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात माजी आमदार संगीता ठोंबरे आणि कारचे ड्रायव्हर (Car Driver) जखमी झाले आहेत.
माहितीनुसार, केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील एका कार्यक्रमासाठी संगीता ठोंबरे गेल्या होत्या त्यावेळी त्यांच्या कारवर दगड फेक करण्यात आली आली. सध्या संगीता ठोंबरे आणि कार ड्रायव्हर उपचार सुरु आहे. मात्र अचानक माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक का? करण्यात आली याची माहिती सध्या समोर आलेली नाही.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार संगीता ठोंबरे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे (Annabhau Sathe) यांच्या जयंती निमित्त दहिफळ वडगाव येथे गेल्या होत्या.
Haryana Election 2024 : भाजपला ‘ती’ जाहिरात नडली, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
संगीता ठोंबरे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी जात असताना त्यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. सध्या केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार माजी आमदार संगीता ठोंबरे आणि कार ड्रायव्हर किशोर बबन मोरे यांच्यावर उपचार सुरू आहे.
चाहत्यांना आदिवी शेष पुन्हा दाखवणार स्पाय थ्रिलरचा ‘जलवा’! ‘या’ दिवशी रिलीज होणार G2