महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचं निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

  • Written By: Published:
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांचं निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

S. M. Krishna Passes Away : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि माजी परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांचं आज पहाटे 2.45 वाजता बेंगळुरू येथील राहत्या घरी निधन झालं. ते 92 वर्षांचे होते. त्यांचं पार्थिव आज मद्दूर येथे नेण्यात येणार आहे. दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहिलेले एम. एम कृष्णा (S. M. Krishna) यांनी नंतरच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केला होता. गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यांना ऑक्टोबरमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

एसएम कृष्णा यांचा जन्म 1932 मध्ये झाला. त्यांचं पूर्ण नाव सोमनहल्ली मल्लैया कृष्णा आहे. ते 1999 ते 2004 पर्यंत कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि 2004 ते 2008 पर्यंत महाराष्ट्राचे राज्यपाल होते. 22 मे 2009 रोजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कृष्णा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला आणि 23 मे 2009 रोजी परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी सोपवली. मार्च 2017 मध्ये एसएम कृष्णा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. 2023 मध्ये सरकारने एसएम कृष्णा यांना पद्मविभूषण देऊन सन्मानित केलं.

Kurla Bus Accident: मोठी बातमी ! कुर्ल्यात बेस्ट बस मार्केटमध्ये घुसल्याने मोठा अपघात; अनेकांना उडवलं

एसएम कृष्णा यांच्या वडिलांचं नाव एससी मल्लैया होतं. कृष्णा यांनी म्हैसूरच्या महाराजा कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर बंगळुरूच्या शासकीय महाविद्यालयातून कायद्याची पदवी घेतली. उच्च शिक्षणासाठी ते अमेरिकेत गेले. तेथून पदवी घेतल्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय कायदा शिकवण्यास सुरुवात केली. अमेरिकेत सक्रिय राजकारणात त्यांची आवड निर्माण झाली. तेथे त्यांनी जॉन एफ केनेडी यांच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी प्रचार केला. कर्नाटकात परतल्यानंतर लगेचच ते 1962 मध्ये कर्नाटक विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. 29 एप्रिल 1964 रोजी त्यांनी लग्न केले.

राजकीय कारकीर्द

एसएम कृष्णा यांनी 1960 च्या सुमारास आपली राजकीय कारकिर्द सुरू केली. 1962 मध्ये त्यांनी मद्दूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव करून निवडणूक जिंकली. यानंतर त्यांनी प्रजा सोशालिस्ट पार्टीमध्ये प्रवेश केला आणि 1968 मध्ये मंड्या लोकसभा जागेची पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर एसएम कृष्णा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 1971 मध्ये मंड्या लोकसभा मतदारसंघातून पुन्हा निवडणूक जिंकली. पुढे 1985 मध्ये पुन्हा राज्याच्या राजकारणात परतले आणि विधानसभा निवडणूक लढवली. 1999 ते 2004 या काळात ते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते.

डिसेंबर 2004 ते मार्च 2008 पर्यंत ते महाराष्ट्राचे राज्यपाल होते. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये एसएम कृष्णा यांनी परराष्ट्र मंत्रीपदही भूषवले होते. जानेवारी 2023 मध्ये, एसएम कृष्णा यांनी जाहीर केले की ते यापुढे सक्रिय राजकारणात राहणार नाहीत. दरमम्यान, कर्नाटकातील मंड्या येथून एसएम कृष्णा अनेकदा खासदार म्हणून निवडून आले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या राजवटीत त्यांनी मंत्री म्हणून काम केले. 1983-84 दरम्यान इंदिरा गांधी आणि 1984-85 दरम्यान राजीव गांधी यांच्या कार्यकाळात ते उद्योग आणि वित्त राज्यमंत्री झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या