G. S. Mahanagar Bank : दिवंगत गुलाबराव शेळके संस्थापक अध्यक्ष असलेल्या मुंबईतील जी. एस. महानगर बँकेच्या (G. S. Mahanagar Bank) संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुंबईचे (Mumbai) जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नितीन काळे यांनी याबाबत माहिती दिली असून 19 जूनला मतदान घेण्यात येणार आहे. बँकेतील संचालक मंडळाच्या 19 जागांसाठी 96 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे निवडणूक चुरशीची होणार असेच दिसते. विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये सासू विरुद्ध सून अशी लढत होणार आहे. दरम्यान या बँकेचे इतिहास काय आहे? व निवडणुकींमधील ही लढत कशी असणार आहे याबाबत आपण जाणून घेऊ.
पारनेर तालुक्यातील मुंबईस्थित विशेषत: व्यावसायिकांना एकत्र करून सॉलीसिटर स्व. गुलाबराव शेळके यांनी या बॅकेचे रोपटे लावले. सुरुवातीपासून स्व. शेळके यांचेच या बँकेवर वर्चस्व राहिले. पुढे त्यांच्या निधनानंतर बॅंकेची सुत्रे त्यांचे चिरंजीव अँड. उदय शेळके यांच्याकडे आली. त्यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेली पहिलीच निवडणूक बिनविरोध केली होती. मात्र कालांतराने उदय यांचे देखील निधन झाले व दोघांच्या पश्चात प्रथमच होत असलेल्या या निवडणुकीमध्ये सुमन (Suman Shelke) व स्मिता शेळके (Smita Shelke) , तसेच (कै.) उदय शेळके यांच्या पत्नी गीतांजली शेळके (Geetanjali Shelke) यांच्या पॅनलमध्ये सरळ लढत होणार आहे.
सासू सुनेच्या नात्याला तडे का गेले?
जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व माजी अध्यक्ष उदय शेळके यांनी बँकेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. मात्र दोघांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पश्च्यात कुटुंबातील कलह याचा परिणाम बँकेवर होऊ लागला. गुलाबराव यांच्या पत्नी सुमन शेळके या बँकेच्या अध्यक्षा आहेत तर त्यांची मुलगी स्मिता शेळके व सुनबाई गीतांजली शेळके या दोघी संचालिका आहे. मात्र सुमन ताई यांचे चिरंजीव उदय शेळके जे गीतांजली शेळके यांचे पती होते उदय यांच्या निधनानंतर गीतांजली शेळके यांनी बँकेच्या वृद्धीसाठी प्रयत्न सुरु ठेवले. मात्र बँकेच्या या व्यवहारामध्ये कौटुंबिक नातं हे अडचणीचं ठरू लागलं. नणंद भावजाई यांचे सूत काही जुळून येईना व मुलीच्या हट्टापायी सुमनताई यांना देखील काही बोलता येईना असे चित्र निर्माण झाले.
गुलाबराव व उदय यांच्या मृत्यूंनंतर बँकेमध्ये सुमनताई यांच्या कन्या स्मिता शेळके यांचा हस्तक्षेप हा वाढला. सुमनताई यांना सर्वोच अधिकार असतानाही स्मिता यांच्या जाचक धोरणात्मक निर्णयामुळे बँकेमध्ये अस्थिरता वाढली व गीतांजली शेळके यांनी देखील याकडे कानाडोळा करण्यास सुरुवात केली. निर्णयात्मक गोष्टींमध्ये गीतानाजळीं यांना डावलण्यात येऊ लागल्याने बँकेचे संस्थापक देखील नाराज होते. अखेर निवडणुकीचे बिगुल वाजले आणि बँकेच्या अध्यक्षा सुमन गुलाबराव शेळके यांच्या नेतृत्वाखाली ” संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व सुमन गुलाबराव शेळके ” पॅनल ” उभा करण्यात आला. व गीतांजली यांनी गुलाबराव शेळके संस्थापक असा पॅनल उभा केला. एकूण 19 संचालकांसाठी ही निवडणूक घेण्यात येणार असून त्यात सर्वसाधारण प्रवर्गातील 14, महिला प्रतिनिधी 02, अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी 01, इतर मागासवगय प्रतिनिधी 01, भटक्या विमुक्त जाती/जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी 01 यांचा समावेश आहे. दरम्यान एकूण 96 अर्ज दाखल झाले होते तर 16 मे पर्यंत किती अर्ज मागे घेतले जातात यांनतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
निकाल भावनिक की बँकेच्या हिताचा होणार?
सुमन व स्मिता शेळके यांच्या पॅनल विरुद्ध गीतांजली शेळके यांचा पॅनल आहे. दोघांमध्ये होणाऱ्या या लढतीमध्ये गीतांजली यांची बाजू भक्कम असल्याचे अधोरेखित होते आहे. स्मिता यांच्या जाचक धोरण व त्यांच्याकडून मिळणारी वागणूक याला संस्थापक कंटाळले आहे. तर गीतांजली यांच्या बाजूने संस्थापक असल्याने त्यांचे पारडे निवडणुकीत भारी ठरते असे दिसते आहे. वडील व भावानंतर वारसा हक्क धोरण स्वीकारत स्मिता या हक्क दाखवत आहे व मुलीसाठी सुमनताई देखील हतबल दिसत आहे मात्र दुसरीकडे गीतांजली शेळके या बँकेचे नेतृत्व चांगल्या प्रकारे करू शकतात अशी चर्चा संस्थापकांमध्ये असल्याने कोणाला साथ मिळणार हे पाहणे महत्वाचे आहे. गुलाबरावांच्या पत्नी म्हणून सुमन ताईंना साथ मिळणार की उदय शेळके यांच्या विचाराने बँकेला धोरण देणाऱ्या गीतांजली शेळके यांच्या बाजूने निकाल लागणार की येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.
पारनेरची कामधेनू
ही महानगर बँक ही पारनेर तालुक्याची कामधेनू आहे. अनेक उद्योजक या बँकेने उभे केले आहेत. मुंबईतील पारनेरकरांना या बँकेचा आधार आहे. जीएस महानगर बँकेचा 1973 साली सुरू झालेला हा प्रवास एका छोट्याशा 9 बाय 18 चौरस फूट खोलीतून सुरु झाला. पुढे गुलाबराव शेळके आणि त्यांचे सहकाऱ्यांनी अथक परिश्रमातून ही बॅक नावारूपाला आणली.आज जीएस महानगर बँकेचा विस्तार संपूर्ण राज्यभरात झालेला आहे.
PM Modi : रात्री पाकला फटकारले अन् आज थेट आदमपूर एअरबेसवर; मोदींनी थोपटली सैनिकांची पाठ
बँकेचे 80 हजार 410 भागधारकांचा बँकेवर ठाम विश्वास असून 68 कोटी 61 भाग भांडवल आहे. 2 हजार 884 कोटींची भक्कम ठेव असून राज्यभर 70 शाखांचा विस्तार झालेला आहे.