Gautami Patil : मुलींनी खचायचं नाहीतर बिनधास्त भिडायचं…
मुलींनी बिनधास्त भिडायचं असतं कारण, मुलांना आपणच जन्म देत असल्याचं ठामपणे नृत्यांगणा गौतमी पाटीलने एका मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. सध्या महाराष्ट्रात असं कुठलं गाव नसेल तिथं सबसे कातिल गौतमी पाटील हे नाव माहित नसेल. कारण आपल्या दिलफेक अंदाजानं गौतमी पाटीलने महाराष्ट्रातल्या तरुणांवर भूरळ पाडलीय. टीका-टिपण्या, आरोपांना सामोरं जात तिने महाराष्ट्रात आपला एक चाहतावर्ग निर्माण केलाय. एका मुलाखतीदरम्यान, मुलींना काय सांगणार , या प्रश्नावर तिने उत्तर दिलंय.
भावना गवळी अन हेमंत पाटलांच वाढलं टेन्शन.. ‘या’ माजी खासदाराने निवडणूक लढवण्याची केली घोषणा
पुढे बोलताना गौतमी म्हणाली, आयुष्यात कोणीच कोणाचं नसतं. स्वत:ला स्वत:च कराव लागतं, आपण मुलींनी कोणावरही अवलंबून राहु नका. आपला जवळचा माणूसही आपला नसतो, ज्याला त्याला स्वत:चं आयुष्य असतं, त्यामुळे मुलींनी कोणावरही अवंलबून राहु नका, असं तिने स्पष्ट केलंय.
आपल्याला आयुष्यात जे काही करायचं आहे ते मुलींनी बिनधास्तपणे केलं पाहिजे. मुलींनी काही केल्यास कोणी नावं ठेवत असतील तर त्याकडे लक्ष देऊ नका. बिनधास्त भिडायचं कारण आपण मुली आहोत मुलांना आपणच जन्म देत असतो, असं परखडपणे गौतमीने स्पष्ट केलं आहे.
Dalai Lama : व्हायरल व्हिडिओ प्रकरणी दलाई लामांनी मागितली माफी, म्हणाले…
मुलींनी आयुष्यात मुलगी आहे म्हणून खचून नाही जायचं. मला चार लोकं काय बोलतील? मी कशी पुढे जाईल? मी हे करु शकते का? असे प्रश्न प्रश्न आयुष्याच्या वळणावर पडत असतात, मात्र, खचायचं नाहीतर बिनधास्त भिडायचं, असंही ती म्हणाली आहेत.
दरम्यान, मुलाखतीदरम्यान, गौतमी पाटीलला दोन पर्याय देत फॅमिली की फॅन्स असे दोन पर्याय देण्यात आले होते. त्यावेळी गौतमी पाटीलने अफलातून उत्तर देत माझं कुटुंबच माझा फॅन्स असल्याचं सांगितलं आहे.
मागील अनेक दिवसांपासून गौतमी पाटीलवर टीका-टिपण्या केल्या जात होत्या. राज्याचे विरोध पक्षनेते अजित पवार यांनीही गौतमी पाटीलच्या नृत्याच्या कार्यक्रमांबाबत कार्यकर्त्यांना तंबी दिली होती. एवढंच नाहीतर हा मुद्दा विधानसभेतही मांडणार असल्याचं पवार यांनी सांगितलं होतं.
अश्लील नृत्याप्रकरणी गौतमी पाटीलने तमाम महाराष्ट्राची माफी मागितल्याचंही समोर आलं होतं. त्यानंतरही तिच्यावर टीका करणं थांबलेलं नसून लोककलेची गौतमी पाटील करू नका, अन्यथा महाराष्ट्राचा बिहार होईल, या शब्दांत तमाशाकर्मी रघुवीर खेडकर दिला आहे. नृत्यांगणा गौतमी पाटीलने अद्याप खेडकर यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिलेलं नाही.