गौतमी पाटीलला हवाय असा जोडीदार

गौतमी पाटीलला हवाय असा जोडीदार

Gautami Patil : गौतमी पाटील हे सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असणारे नाव आहे. गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी जशी तिच्या चाहत्यांची गर्दी होती तसेच तिच्या विषयी जाणून घेणाऱ्याची संख्याही कमालीची आहे. यातच आपल्या अदाकारीने चाहत्यांना वेड लावणारी गौतमी नुकतेच तिच्या स्वप्नातल्या राजकुमाराविषयी बोलली आहे. आयुष्यात आपल्याला कसा जोडीदार हवा आहे याविषयी प्रथमच गौतमी पाटील हिने सांगितले आहे. गौतमी म्हणाली,मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे.

सबसे कातील गौतमी पाटील म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला माहिती झालेले एक नाव सध्या वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच चर्चेत राहत आहे. गौतमी पाटील ( Gautami Patil Dance ) आपल्या डान्सने चाहत्यांना अक्षरश वेड लावते. ज्या ठिकाणी गौतमीचा कार्यक्रम आयोजित केला जातो त्या ठिकाणी प्रेक्षकांची एवढी गर्दी होती की यासाठी पोलीस बंदोबस्त बोलावावा लागतो. तिच्या शोची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

याच दरम्यान नृत्यांगना म्हणून परिचित असलेली गौतमीने नुकतेच तिच्या खासगी आयुष्यातील एका गोष्टींवर वक्तव्य केले आहे. गौतमी लग्न कधी करणार हा प्रश्न तिच्या चाहत्यांना नक्कीच पडला असेल. मात्र आता खुद्द गौतमीने आपल्याला कसा जोडीदार हवा आहे याविषयी दिलखुलास गप्पा मारत माहिती दिली आहे.

अयोध्या दौरा ! फडणवीसांचे शिंदेंना ‘सरप्राईज’

एका मुलाखतीत गौतमी म्हणाली, माझं शालेय शिक्षण मुलींच्या शाळेत झालं आहे. वडिलांचं लवकर निधन झालं. पाठीमागे घरामध्ये कोणीच कर्ता व्यक्ती नव्हता. ना वडील ना भाऊ, ना नातेवाईक. त्यामुळे कमी वयातच घराची जबाबदारी आपल्या खांद्यावर आली. मात्र या आयुष्यात घरातल्या जबाबदाऱ्यांचा काही वाटा उचलण्यासाठी तरी एक जोडीदार आयुष्यात असायला हवा, अशी माझी इच्छा आहे. याच कारणाने मला लग्न करायचं आहे.

फडणवीस म्हणाले… हा तर शरद पवारसाहेबांचा अपमान

पुढे बोलताना गौतमी म्हणाली, मला पैसे, बंगला, प्रतिष्ठा या कशाची गरज नाही. पण येईल त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे. जेव्हा असा मुलगा मिळेल तेव्हाच मी लग्नाचा विचार करेन. माझे सध्या वय हे 25 वर्षे मात्र अद्यापही माझं लग्न झालेलं नाही. पण लवकरच लग्नबंधनात अडकण्याची माझी इच्छा आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube