धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत संदिप क्षीरसागरांचा मोठा दावा; म्हणाले, वाल्मिक कराड…

यावेळी संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत भाष्य केले. मला वाटत नाही

  • ganesh pokale
  • Written By: Published:
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत संदिप क्षीरसागरांचा मोठा दावा; म्हणाले, वाल्मिक कराड...

Sandeep Kshirsagar on Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोप वाल्मिक कराड याला प्रशासन आणि पोलिसांकडून विशेष वागणूक दिली जात आहे. धनंजय मुंडे मंत्रि‍पदी असल्यामुळे या गोष्टी घडत आहेत, (Dhananjay Munde)असा थेट घणाघात बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी केलं आहे. संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने होण्यासाठी आणि प्रशासना मोकळा श्वास घेऊ द्यायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा मंत्रि‍पदाचा राजीनामा घेतला पाहिजे.

वाल्मिक कराड सरेंडर होण्यापासून ते आता रुग्णालायपर्यंत त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट देण्यात आली. धनंजय मुंडे मंत्रीपदी असल्यामुळे या गोष्टी घडत आहेत. 28 तारखेला बीडमध्ये मोर्चा निघाला होता. त्यावेळीही वाल्मिक कराड पुण्यातील एका मोठ्या रुग्णालयात उपचार घेत होता. त्याठिकाणी वाल्मिक कराड दोन ते तीन दिवस होता. लोक रस्त्यावर उतरल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला होता. वाल्मिक कराडला या रुग्णालयात कोणी ॲडमिट केलं आणि ते अचानक का फरार झाले, याचा तपास झाला पाहिजे, असे संदीप क्षीरसागर यांनी म्हटले. ते आज ध्वजारोहनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कृषी खात्यातील भ्रष्टाचाराचा हा परळी पॅटर्न; यामध्ये धनंजय मुंडे यांचीच चौकशी.. वडेट्टीवारांचा थेट वार

यावेळी संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख हत्याप्रकरणातील एकमेव फरार आरोपी कृष्णा आंधळे याच्याबाबत भाष्य केले. मला वाटत नाही, आता आंधळे सापडेल. त्या भागात जे काही घडतं, त्या भागाचा जो काही इतिहास आहे, त्यावरुन आंधळे सापडेल असे वाटत नाही. पोलिसांना तो सापडायचा असता तर एव्हाना सापडला असता. पण आता तसे वाटत नाही, असे क्षीरसागर यांनी म्हटले.

मी सुरुवातीपासून सीडीआर तपासा असे सांगत होतो. आता त्यादृष्टीने पोलीस तपास करु लागल्यानंतर नवीन सीसीटीव्ही फुटेज समोर आली आहेत. त्यामुळे तपासाची साखळी जुळत चालली आहे. वाल्मिक कराड याला अटक झाल्यानंतरही राज्यभरात मोर्चे काढून रोष व्यक्त केला जात आहे. यावरुन वाल्मिक कराडविरोधातील जनभावनेचा अंदाज येतो, असे संदीप क्षीरसागर यांनी सांगितले.

follow us