MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! शासकीय नोकरीच्या वयोमर्यादेत शिथिलता, परिपत्रक जारी

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी ! शासकीय नोकरीच्या वयोमर्यादेत शिथिलता, परिपत्रक जारी

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC) एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता MPSC च्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शासकीय नोकरीच्या वयोमर्यादेत शिथिलता देण्यात आली आहे. या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये आयोगाकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या एमपीएससीच्या परिक्षांच्या जाहिरातींसाठी वयोमर्यादेमध्ये तब्बल दोन वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे.

गेल्या दोन वर्षांमध्ये कोरोनामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अनेक परिक्षा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या वयोमर्यादेतील तब्बल दोन वर्ष वाया गेली आहेत. ज्यादरम्यान त्यांनी अभ्यास करून देखील त्यांना संबंधित पदांच्य जाहिराती न निघाल्याने परिक्षाच देता आलेल्या नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

2 मार्चला सरकारने या निर्णयासंदर्भात परिपत्रक काढले होते. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात परिपत्रक जाहीर केले होते. त्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (MPSC)या संदर्भातील परिपत्रक जारी करण्यात आले आहे. त्यामुळे आता शासकीय नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगून असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.

कोण-कोणत्या भरतीमध्ये मिळणार शिथिलता ?

आरोग्य विभागाचा ऐतिहासिक निर्णय; महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना

उपअभियंता, विद्युत, गट अ

उपसंचालक, गट अ भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

मुख्य खोदन अभियंता, गट अ, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सहाय्यक रसायनी गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा

सहाय्यक प्रशासन गट ब, भूजल सर्वेक्षण व विकास योजना

सहाय्यक आयुक्त, तांत्रिक, महाराष्ट्र तांत्रिक सेवा गट ब

सहाय्यक संचालक, राज्य रेशीम सेवा गट अ

रेशीम विकास अधिकारी राज्य रेशीम सेवा, श्रेणी एक, गट ब

सहाय्यक संचालक, गट ब सांस्कृतिक कार्य संचलनालय

महाराष्ट्र राज्यपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परिक्षा 2023

आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत प्रसिद्ध होणाऱ्या एमपीएससीच्या परिक्षांच्या जाहिरातींसाठी वयोमर्यादेमध्ये तब्बल दोन वर्षांची शिथिलता देण्यात आली आहे. तर यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारिख ही 3 एप्रिल 2023 ही असणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube