सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही लुटीचा अड्डा; त्रिभाजनाच्या निर्णयानंतर पडळकरांची प्रतिक्रिया

भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजार समित्या लुटीचे अड्डे बनल्या होत्या, अशी टीकाही केली केली आहे.

News Photo   2026 04 07T153315.670

सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती ही लुटीचा अड्डा झाली होती, असं विधान भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी त्रिभाजनाच्या निर्णयावरून केलं आहे. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्यात आलं असून, या बाजार समितीवर प्रशासक नेमण्यात आला आहे. जत आणि कवठेमंकाळ कृषी उत्पन्न बाजार समित्या आता स्वतंत्र होणार आहेत. पणन व सहकार खात्याच्या निर्णयाचे स्वागत करताना भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी बाजार समित्या लुटीचे अड्डे बनल्या होत्या, अशी टीकाही केली केली आहे. ते सांगलीत माध्यमांशी बोलत होते.

आम्ही सगळे सैनिक, आमचा एकच अर्जुन; बीडच्या ओबीसी एल्गार मेळाव्यातून पडळकरांची तोफ धडाडली

सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनावर निर्णय झाला असून कवठेमहांकाळ व जत तालुक्यांसाठी स्वतंत्र कृषि उत्पन्न बाजार समित्या स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केला. येथील वसंतदादा आवार, मिरज दुय्यम बाजार आवार आणि विष्णूअण्णा फळे व भाजीपाला आवार यांचा कारभार एकत्र असेल. याबाबत जिल्हा उपनिबंधक तथा सहकारी संस्था सांगलीचे अधिकारी सुनिल चव्हाण यांनी अधिसूचना जारी केली.

ही अधिसूचना जारी होताच विद्यमान संचालक मंडळ बरखास्त झाले असून सांगलीसाठी प्रशासकीय मंडळ तर जत व कवठेमहांकाळसाठी प्रशासक नियुक्ती करण्यात आली. राज्यात बाजार समिती विभाजनाबाबतचा हा पहिलाच निर्णय असल्याचं सांगण्यात आले. व्यापाऱ्यांनी फटाके वाजवून या निर्णयाचे स्वागत केलं.

 

Tags

follow us