ग्रामपंचायतीच्या निवडणुका लांबणीवर? ‘या’ कारणाने पुढच्या वर्षी वाजणार निवडणुकीचा बिगुल
Gram Panchayat Election : राज्यात होणाऱ्या 15 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला असल्याची माहिती समोर येत आहे.
Gram Panchayat Election : राज्यात होणाऱ्या 15 हजार ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला ब्रेक लागला असल्याची माहिती समोर येत आहे. या वर्षी राज्यातील 15 हजार 636 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका होणार होत्या मात्र आता या निवडणुकीसाठी प्रक्रिया पुढील सुरु होणार असल्याची माहिती राजकीय वर्तुळातून समोर येत आहे. ग्रामपंतायतींच्या निवडणुकीसाठी प्रभाग आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे मात्र आता यापुढची प्रक्रिया पुढच्या वर्षी होणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, वर्ष 2024, 2025 आणि 2026 मध्ये मुदत संपणाऱ्या राज्यातील 15 हजार 636 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका 2026 मध्ये पार पडणार होते. या निवडणुकींसाठी प्रभाग आरक्षण देखील जाहीर करण्यात आले आहे. मात्र राज्यात सध्या निवडणूक आयोगाकडून (Election Commission) मतदार यादी पडताळणीच्या एसआयआर (SIR) प्रक्रिया सुरु असल्याने ग्रामपंचायती निवडणुकींचा बिगुल पुढच्या वर्षी वाजण्याची शक्यता असल्याची माहिती मीडिया अहवालात देण्यात आली आहे.
15 हजार 636 ग्रामपंचायतींसाठी (Gram Panchayat Election) राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि प्रभाग आरक्षण सोडतीची प्रक्रिया पूर्ण केली आहे. बुधवारी 8 जुलै रोजी प्रभाग आरक्षण अंतिम करण्यात आले असून 10 जुलै रोजी ते प्रसिद्ध केले जाणार आहे. आरक्षण प्रसिद्ध झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून काही दिवसांच्या आता मतदारयाद्या आणि निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येतो मात्र सध्या राज्यात एसआयआर प्रक्रिया सुरु असल्याने मतदारयाद्या प्रसिद्ध करता येणार नसल्याने ग्रामपंचायत निवडणुका पुढील वर्षी होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र याबाबात आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आलेली नाही.
राज्यात आज धो धो पाऊस, ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी
राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, एफआयआर प्रक्रियेअंतर्गत मतदारयादीतून मृत, स्थलांतरित आणि अपात्र मतदारांची नावे वगळली जात आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध होणार आहे.