Dr. Ravi Godse On H3N2 Virus : भारतामध्ये गेल्या तीन वर्षापासून कोरोनाने थैमान घातले होते. या कालावधीत नागरिक लॉकडाऊनमुळे हैरान झाले होते. त्यानंतर कोरोनाचे काही नवीन व्हॅरिअंट देखील आले होते. आता पुन्हा नागरिकांची चिंता वाढवणारा व्हायरस आला आहे. H3N2 व्हायरस असे या व्हायरसचे नाव आहे. हा एक फ्लूचा व्हायरस आहे. या व्हायरसमुळे आत्तापर्यंत 4 मृत्यू झालेले आहेत. त्यामुळे फ्लूपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्यावी, याबाबत लेट्सअप मराठीने अमेरिकेतील डॉ. रवी गोडसे ( Dr Ravi Godse ) यांच्याशी बातचित केली आहे. त्यांनी या व्हायरसपासून वाचण्यासाठी कशी काळजी घ्यावी, ते सांगितले आहे.
H3N2 व्हायरस हा काही नवीन नाही. गेली हजारो वर्षापासून हा व्हायरस अस्तित्वात आहे. हा एक फ्लू व्हायरस आहे. 1918 साली जी महामारी आली होती ती देखील या फ्लू व्हायरसमुळे आली होती. तसेच 1968 साली देखील जी महामारी आली होती ती सुद्धा या फ्लूमुळे आली होती. भारतीय लोकांमध्ये या व्हायरस विरुद्ध लढण्याची रोगप्रतिकारक शक्ती आहे, असे डॉ. गोडसे म्हणाले आहेत.
मोठी बातमी; H3N2 इन्फ्लुएंझाने वाढवली चिंता, महाराष्ट्रातील पहिला बळी अहमदनगरमध्ये
या फ्लुमुळे आता कोणतीही महामारी नाही तसेच या महामारीमुळे लॉकडाऊन देखील लागणार नसल्याचे गोडसे यांनी सांगितले आहे. हा फ्लू थोड्या प्रमाणात कोविडसारखा आहे. काही प्रमाणात याचे व्हॅरिअंट बदलतात. पण मोठ्या प्रमाणावर काहीही बदल होत नाही. भारतीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर या फ्लूच्या विरोधात रोगप्रतिकारक शक्ती आहे, असे गोडसे म्हणाले आहेत.
कोविड हा पूर्णपणे नवीन होता. त्यामुळे त्याच्याशी कशा पद्धीतीने सामना करायचा ते आपल्याला माहित नव्हते. परंतु भारतामध्ये प्रत्येकाला लहाणपणापासून अनेकवेळा सर्दी, खोकला झालेला असतो. त्यामुळे त्यांच्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणावर असते. जर कुणाला मोठ्या प्रमाणावर सर्दी झाली तर त्याला निमोनिया होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे निमोनिया जरी झाला तरी त्याची काळजी घ्यावी. या व्हायरसवर आधीपासून औषधे व व्हॅक्सीन उपलब्ध आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काहीही कारण नाही, असे ते म्हणाले आहेत.
शिंदे-फडणवीस तुम्हीच आमच्याकडे या; शेतकऱ्यांच्या इशाऱ्यानंतर लाँग मार्चमध्ये नवा ट्विस्ट !
1 जुलै 1969 या तारेखेच्या आधी ज्यांच्या जन्म झालेला आहे, त्यांना या व्हायरस पासून मोठ्या प्रमाणावर संरक्षण असेल, असा दावा त्यांनी केला आहे. तसेच कोविडची व्हॅक्सीन व या व्हायरसची व्हक्सीन यामध्ये फरक आहे. कोविडची व्हॅक्सीन ही फक्त कोविड पुरतीच मर्यादित आहे. याऊलट व्हायरसची व्हॅक्सीन ही दरवर्षी अपडेट करावी लागते, असे त्यांनी सांगितले आहे.
या व्हायरसमुळे मृत्यूचा धोका खुप कमी आहे. हा फ्लू भारतात अनेकांना होऊ शकतो, पण त्यामुळे मृत्यूचा धोका खुप कमी आहे, असे ते म्हणाले आहे. फक्त वय वर्ष 65 पेक्षा अधिक, वय वर्ष 2 पेक्षा कमी, ज्या महिला गरोदर आहेत व ज्यांनी 2 आठवड्यापूर्वी बाळाला जन्म दिला आहे त्या महिला त्यांच्यासाठी हायरिस्क आहे. पण या लोकांना देखील हा आजार होण्याची शक्यता खुप कमी आहे. जरी हा आजार झाला तरी या आजारामुळे मृत्यू होण्याचा धोका देखील खुप कमी आहे, असे डॉ. गोडसे यांनी सांगितले आहे.
या आजारावर औषध उपलब्ध आहे. ते औषध स्वस्त किंमतीमध्ये असून हे औषध तोंडाने देखील घेता येते. घरामध्ये देखील हे औषध घेता येते. त्यामुळे फ्लू झाल्यास घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. शक्य झाल्यास फ्लू झाल्यानंतर 48 तासांच्या आतमध्ये हे औषध घ्या, असे डॉ. गोडसे म्हणाले आहेत.