मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात

  • Written By: Published:
मोठी बातमी! आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कारचा भीषण अपघात

Tanaji Sawant Car Accident : दोन दिवसांपूर्वी कॉंग्रेस आमदार बलवंत वानखडे यांच्या कारला अपघात झाल्यानं एका शेतकऱ्यााचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता आरोग्यमंत्री तानाजी सावं (Tanaji Sawant) यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. कोल्हापुरात सावंतांच्या ताफ्यातील कारला अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दोन कारच्या धडकेने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे
या अपघातात एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

Pune Lok Sabha 2024 : ‘ …तर पुणे लोकसभा निवडणूक लढवणार’; सुनिल देवधरांची घोषणा 

मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत हे कोल्हापूरच्या अंबाबाई देवीचे दर्शन घेऊन श्रीक्षेत्र ज्योतिबाच्या दर्शनाला निघाले होते. यावेळी त्यांच्या ताफ्यातील मागच्या गाडीने सावंतांच्या गाडीला जोरदार धडक दिली. पन्हाळा रोडवरील राजपूत वाडीत हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अचानक पुढील गाड्यांचा वेग कमी झाल्यामुळं मागच्या गाडीने पुढच्या कारला धडक दिली. त्यामुळं हा अपघात झाला. धडक देणाऱ्या गाडीच्या बोनेटचा अक्षरशा: चक्काचुर झाला आहे. यावरून हा अपघात किती भीषण होता, हे लक्षात येतं.

 

दरम्यान, या अपघातात सुदैवाने तानाजी सावंत यांना कोणताही दुखापत झाली नाही. मात्र, सावंत यांचे स्वीय सहाय्यक रवीराज जाधव हे या अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना प्राथमिक उपचारासाठी रुग्णायात दाखल करण्यात आलं आहे.

सावंत यांच्या ताफ्यात सात ते आठ गाड्या होत्या, अशी माहिती आहे. मात्र, यावेळी आरोग्यमंत्र्यांच्या ताफ्यात कोणतीही जिल्हा प्रशासनाची रुग्णवाहिका नसल्याचं समोर आलं आहे.

या अपघातानंतर मंत्री सावंत हे दुसऱ्या शासकीय वाहनाने तातडीने जोतिबाच्या दर्शनाला रवाना झाले. दर्शन घेऊन ते पुढील नियोजित कार्यक्रमासाठी गेल्यांचं पोलिसांनी सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube