Maharashtra Rain Alert : पुढील 48 तास राज्यात मुसळधार पाऊस; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाची दमदार सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Maharashtra Rain Alert

Maharashtra Rain Alert : राज्यात पुन्हा एकदा पावसाची दमदार सुरुवात झाली असल्याने शेतकऱ्यांसह अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात मुसळधार सरी कोसळत आहे. तर दुसरीकडे पुढील 48 तास राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

पुढील 48 तास मुसळधार पाऊस

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे (Pune) , मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहणार आहे. तर विदर्भात पुढील 24 तासांत अमरावती, भंडारा, गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यात मुसधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पुढील 24 तास होणाऱ्या अति मुसळधार पावसामुळे नागरिकांना सर्तक राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आज पावसाचा अंदाज काय?

हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पुणे घाटमाथा, कोकण घाटमाथा, पालघरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर रायगड,रत्नागिरी (Ratnagiri) , नाशिक (Nashik) आणि सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने या जिल्ह्यांसाटी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Ashish Shelar : दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या प्राथमिक पुनर्विकास आराखड्यासह चित्रपट धोरणाचा मसुदा सादर

तर नंदूरबार, जळगाव, धुळे, नाशिक, बुलडाणा, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात आज विजांसह वादळी पावसाचा अंदाज असल्याने या जिल्ह्यांसाठी देखील हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आले आहे.

follow us